मुंबई : देशात सर्वांत विश्वासार्ह मराठी वर्तमानपत्र म्हणून ‘लोकमत’च अव्वल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. टीआरए रिसर्च या संस्थेने राष्ट्रीय पातळीवर केलेल्या सर्वेक्षणात देशातील सर्वांत विश्वासार्ह असलेल्या १ हजार ब्रँडची यादी घोषितकेली आहे. त्यात मराठी वर्तमानपत्रांत केवळ ‘लोकमत’चा समावेश असून, इतर कोणत्याही मराठी वर्तमानपत्राला या यादीत स्थान मिळवता आलेले नाही.टीआरए रिसर्च संस्थेने नरिमन पॉइंट येथील एका हॉटेलमध्ये मंगळवारी ‘ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट २०१८’ सादर केला. त्यात प्रादेशिक वर्तमानपत्रांच्या यादीत ‘लोकमत’ने बंगाली भाषेतील ‘आनंदबाजार पत्रिका’लाही मागे टाकले आहे. याआधी देशातील मराठी वर्तमानपत्रांत सर्वाधिक वाचक संख्या आणि आकर्षक ब्रँडमध्ये ‘लोकमत’ने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर सर्वांत विश्वासार्ह वर्तमानपत्रांतही ‘लोकमत’ने आपले स्थान कायम राखले आहे.देशातील विविध १६ शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वेक्षणादरम्यान कोणत्याही व्यक्तीला ब्रँडचे नाव सांगण्यात आले नव्हते, असे टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली यांनी सांगितले.
विश्वासार्हतेत ‘लोकमत’च अव्वल; मराठी वर्तमानपत्रांत पहिला आणि एकमेव क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 3:45 AM