शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

मुंबईत रंगणार ‘लोकमत वॉटर समिट २०१७’

By admin | Published: July 10, 2017 6:05 AM

वातावरणाचा बदलता पोत लक्षात घेता पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठविण्याची गरज निर्माण झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जलसंधारण हे आजच्या घडीला सर्वांत मोठे आव्हान बनले आहे. वातावरणाचा बदलता पोत लक्षात घेता पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठविण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ म्हणीप्रमाणे गावांसह शहराशहरांतून पाणी बचत करत ‘जलसमृद्ध महाराष्ट्र’ निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढे सरसावण्याची गरज आहे. याचाच सारासार विचार करत, एक पाऊल पुढे टाकत ‘लोकमत वॉटर समिट २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत अंधेरी पूर्वेकडील ‘आयटीसी मराठा’ येथे मंगळवार, ११ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता ‘वॉटर समिट’ला प्रारंभ होणार आहे. दुपारी १.३० वाजेपर्यंत समिटसाठी नोंदणी होईल. दुपारी १.३० वाजता समिटचे उद्घाटन जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्याहस्ते होणार आहे. जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील. ‘तरुण भारत संघा’चे अध्यक्ष आणि जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, राज्याचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची प्रमुख उपस्थिती असेल. ‘लोकमत’ मीडियाचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा हे उद्घाटन सत्रात स्वागतपर मार्गदर्शन करतील. ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव मेहता हे देखील या सत्रात उपस्थितांना मार्गदर्शन करतील. उद्घाटन सत्रानंतर राज्यभर जलसंधारणासाठी कार्यरत असलेल्या दिग्गजांचा गौरव होईल. त्यानंतरच्या सत्रात गिरीष महाजन, राम शिंदे, बबनराव लोणीकर यांना ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर बोलते करतील. पहिल्या सत्रात ‘जलसंधारणातील सध्याची आव्हाने आणि शासनाचे प्रयत्न’ या विषयावरील चर्चेत राज्य सरकारचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, ‘ड्रॉप डेड फाऊंडेशन’चे संस्थापक आबिद सुरती, ‘महिंद्रा ग्रुप’चे चीफ सस्टेनेबिलिटी आॅफिसर अनिरबन घोष, ‘गोवर्धन इको व्हिलेज’चे चीफ सस्टेनेबिलिटी आॅफिसर निमाई लीला दास आणि ‘युनिसेफ इंडिया’चे वॉश स्पेशलिस्ट युसूफ कबीर आदी मान्यवर सहभागी होतील. या सत्राचे सूत्रसंचालन ‘द ंिहंदू’ वृत्तपत्राचे निवासी संपादक सचिन कालबाग हे करतील. दुसऱ्या सत्रात ‘स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी : निरोगी जनतेसाठी आवश्यक’ या विषयावरील चर्चासत्रात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे संचालक डॉ. सतीश उम्रीकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोष कुमार, ‘सिडको’चे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि ‘टेरी’चे सल्लागार जी. एस. गिल, ‘वॉटर फॉर पीपल’चे संचालक मीना नरुला आदी मान्यवर सहभागी होतील. या सत्राचे संचालन ‘सेफ्टी वॉटर उपक्रमा’च्या उपाध्यक्ष पूनम सेवक या करतील.तर तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात ‘पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी व्यावहारिक उपाय’ या विषयावर चर्चासत्र रंगेल. त्यात राज्य सरकारच्या जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ ढवळे, ‘आकार चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष अमला रुईया, भाभा अणुसंशोधन केंद्राच्या विकास विभागाचे प्रमुख आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. आर.सी. बिंदल, ‘अंबुजा सिमेंट’च्या सीएसआरचे अध्यक्ष पिरल तिवारी, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा आदी मान्यवरांचा सहभाग असेल.>मान्यवरांची उपस्थितीया समिटला राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील. ‘तरुण भारत संघा’चे अध्यक्ष आणि जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, राज्याचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची प्रमुख उपस्थिती असेल.