शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

लोकमत वुमेन समीट : कर्तबगार महिलांच्या नेतृत्वाचा उलगडणार प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 12:28 PM

महिला नेतृत्व व कर्तुत्वाला सलाम करण्यासाठीच या वर्षीच्या वुमेन समीटची संकल्पना लिव्ह टू लीड अशी आहे.

ठळक मुद्देएनईसीसी आणि लेक्झिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा सहयोग, विविध क्षेत्रांतील मान्यवर महिलांचा सहभाग

पुणे : लोकमततर्फे एनईसीसी व लेक्झिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या सहकार्याने लोकमत वुमेन समीटचे आठवे पर्व पुण्यात मंगळवारी (दि. २३) आयोजिण्यात आले आहे. सावित्रीबाई फुलेंना महिलांच्या शिक्षणासाठी सहन करावे लागलेले दगडांचे घाव ते आज लोकसभेतील ७८ महिला खासदार येथपर्यंतचा नेतृत्वाचा प्रवास  (लिव्ह टू लीड) या संकल्पनेतून उलगडणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महाराष्ट्र महिला आयोग आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होणार आहे. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील. परिषदेला प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू, राजश्री देशपांडे, सौंदर्या शर्मा, जल आणि शाश्वत विकासच्या तज्ज्ञ रुपाली देशमुख, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव विनीता सिंघल,   लेक्झिकॉन स्कूल्सच्या संचालिका डॉ. मोनिषा शर्मा, सिम्बायोसिसच्या संचालक स्वाती मुजुमदार, तृतीयपंथीयांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या गौरी सावंत, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, ऐश्वर्या तमाईचीकर, उद्योजिका सुजाता चॅटर्जी, श्रद्धा शर्मा,  प्रसिद्ध वेडिंग डेकोर डिझायनर गुरलीन पुरी उपस्थित राहणार आहेत. 

महिलांनी आज समाजाच्या सर्व  क्षेत्रांत नेतृत्वाच्या दिशेने झेप घेतली आहे. मात्र, हा प्रवास सोपा नव्हता. महिलांच्या शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या सावित्रीबाईंच्या दिशेने दगड फेकले गेले. त्यावरही महिलांनी मात केली. शिक्षणाचे अग्निपंख मिळाल्याने देशातील पहिल्या डॉक्टर म्हणून  आनंदीबाई जोशी  यांनी मान मिळविला. संस्कृतमध्ये वादविवाद करून शास्त्रार्थात सनातन्यांचा पराभव करणाऱ्या रमाबाई रानडे यांचे कर्तृत्व अढळ ताऱ्यासारखे चमकू लागले. लक्ष्मीबाई टिळक यांनी महिलांची व्यक्त होण्याची वाट प्रशस्त केली. महिलांच्या इतिहासातील या चारही टप्प्यांनी महिलांना नेतृत्वाकडे झेप (लिव्ह टू लिड) घेणे शक्य झाले. विविध परिसंवादातून हा प्रवास उलगडणार आहे. डीपीईएस व हॉटेल माधव इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी आणि धीरेंद्र आऊटडोअर मीडिया प्रा. लि. आऊडोअर पार्टनर आहेत.............. 

* महिलांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोकमत सखी मंचाची स्थापना झाली. सर्वच क्षेत्रांतील महिलांच्या नेतृत्वावर लोकमत वुमेन समीटमध्ये सातत्याने चर्चा होते. महिला नेतृत्वाला सलाम करण्यासाठीच या वर्षीच्या वुमेन समीटची संकल्पना लिव्ह टू लीड अशी आहे. देशपातळीवर यावर चर्चा घडविण्यात यंदाची लोकमत वुमेन समीट महत्त्वाची भूमिका बजावेल, असा मला विश्वास आहे. - विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड 

............

* अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘नारी तू नारायणी’ अशी घोषणा अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे. एक समिती नेमून देशाचा विकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांना भागीदार बनविण्यासाठी ही समिती काम करणार आहे. लोकमत वुमेन समीटमधील चर्चा यासाठी उपयुक्त ठरणार आहे. - उषा काकडे, अध्यक्ष, ग्रॅव्हिट्स फाउंडेशन 

टॅग्स :Lokmat Women Summitलोकमत वुमेन समीटLokmat Eventलोकमत इव्हेंटTaapsee Pannuतापसी पन्नूVijaya Rahatkarविजया रहाटकरNeelam gorheनीलम गो-हे