शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

‘लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत कुलकर्णी यांचे निधन

By admin | Published: February 02, 2017 5:43 PM

पत्रकारिता क्षेत्रात स्वत:चा मानदंड निर्माण करणारे ‘लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत दत्तात्रेय कुलकर्णी यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 2 - अत्यंत परखड आणि तटस्थ पण तितक्याच लालित्यपूर्ण शैलीत लेखन करत पत्रकारिता क्षेत्रात स्वत:चा मानदंड निर्माण करणारे ‘लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत दत्तात्रेय कुलकर्णी यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. नाशिक येथील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि.३) सकाळी ९.३० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी कालिंदी, दोन विवाहित मुली मुग्धा शहा व प्राजक्ता जडे, जावई, तीन भाऊ असा परिवार आहे. हेमंत कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने कॉलेजरोडवरील विजन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच गुरुवारी दुपारी २.५० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी कॉलेजरोडवरील पाटील लेन नंबर ४ मधील ‘पुष्कराज’ या निवासस्थानापासून निघणार आहे. मूळचे अहमदनगरनिवासी असलेल्या हेमंत कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण नागपूर येथे दादा चौधरी विद्यालयात झाले. नागपूर विद्यापीठातूनच त्यांनी पत्रकारितेतील पदवी संपादन केली होती. पत्रकारितेची वाट चोखाळणाऱ्या कुलकर्णी यांनी थेट मुंबई गाठली आणि लोकसत्तामधून त्यांनी पत्रकारितेचा श्रीगणेशा केला. लोकसत्ताचे माजी संपादक कै. विद्याधर गोखले यांचे बोट धरत त्यांची वाटचाल सुरू झाली आणि एक विलक्षण अशी शैली आत्मसात करत कुलकर्णी यांनी पत्रकारितेत स्वतंत्र ठसा उमटविला.मुंबईनंतर कुलकर्णी यांनी १९८२-८३ पासून नाशिक येथे लोकसत्ताच्या जिल्हा प्रतिनिधीपदाची सूत्रे स्वीकारली. लोकसत्तामधील त्यांनी चालविलेले ‘वेध उत्तर महाराष्ट्राचा’ हे सदर विशेष लोकप्रिय ठरले होते. समाजातील विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणाऱ्या कुलकर्णी यांचे ‘भाष्य’ स्तंभलेखनही गाजले. डिसेंबर २००३ मध्ये त्यांनी ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीच्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली होती. तेरा वर्षांपासून ‘लोकमत’मध्ये कार्यरत असलेल्या कुलकर्णी यांची गेल्याच वर्षी सहयोगी समूह संपादकपदी नियुक्ती झाली होती. पत्रकाराने समाजात वावरताना आणि प्रसंगी लोकांशी समरस होतानाही आपली तटस्थ भूमिका अबाधित ठेवली पाहिजे आणि कोणत्याही घटनेचे विश्लेषण त्रयस्थाच्या भूमिकेतून अत्यंत परखडपणे केले पाहिजे, अशी धारणा घेऊन पत्रकारिता करणाऱ्या कुलकर्णी यांचा लेखनसंग्रह ‘परखड’ या शीर्षकाखाली जून २००१ मध्ये प्रसिद्ध झाला होता. एक लिहिता संपादक म्हणून त्यांची ख्याती होती. ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर, माधव गडकरी, अरुण टिकेकर या मान्यवर संपादकांचा त्यांना सहवास लाभला होता. साहित्य क्षेत्राबाबतही त्यांची विशेष रुची होती. पत्रकारितेतील त्यांच्या कर्तृत्वाचा अनेक संस्थांनी गौरव केला होता. कुलकर्णी यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.