शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

लोकनेते विक्रमसिंह घाटगे यांचे निधन

By admin | Published: April 14, 2015 1:25 AM

शाहू साखर कारखान्याचे संस्थापक व लोकनेते राजे विक्रमसिंह जयसिंगराव घाटगे यांचे सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखानदारीत स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची नवी वाट तयार करणारे कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक व लोकनेते राजे विक्रमसिंह जयसिंगराव घाटगे यांचे सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते़ कागलवाडी परिसरातील राजघराण्याच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने साखर कारखानदारीतील ‘दीपस्तंभ,’ उमदा नेता व दिलदार राजा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे़त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती सुहासिनीदेवी, मुलगा व शाहू दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक समरजितसिंह, कन्या तेजस्विनी भोसले, बहीण बडोद्याच्या हर्षलाराजे गायकवाड, अमरावतीच्या रंजनाराजे देशमुख व जतच्या ज्योत्स्नाराजे डफळे, भाऊ प्रवीणसिंह असा परिवार आहे. घाटगे यांना मधुमेहाचा त्रास होता. काही वर्षांपूर्वी त्यांची अँजिओप्लास्टीही झाली होती. दोन-तीन दिवसांत धाप लागल्यासारखे वाटू लागल्याने सोमवारी त्यांनी डॉ. दिलीप कुलकर्णी यांची वेळ घेतली होती. मात्र सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली़ विक्रमसिंह घाटगे हे राज्य साखर संघाचे अध्यक्ष होते. कागल विधानसभा मतदारसंघातून ते १९७८ व १९८० असे दोन वेळा आमदार झाले. पुढे १९९८ मध्ये त्यांनी कोल्हापूरातून लोकसभा लढवली. ( प्रतिनिधी) विक्रमसिंह घाटगे हे राज्य साखर संघाचे अध्यक्ष होते. कागल विधानसभा मतदारसंघातून ते १९७८ व १९८० असे दोन वेळा आमदार झाले. पुढे १९९८ मध्ये त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली; परंतु त्यात त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी साखर कारखानदारीत लक्ष केंद्रित केले होते़ राजर्षी शाहूंचे नातू...कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे कागलचे घाटगे हे जनक घराणे. त्यामुळे विक्रमसिंह घाटगे हे नात्याने राजर्षी शाहू महाराज यांचे नातू. विक्रमसिंह यांचे आजोबा पिराजीराव घाटगे यांचे लहान भाऊ असलेले शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर दत्तक आले. शाहू महाराजांचे कार्य आभाळाएवढे. त्यामुळे त्यांची उंची आपल्याला कधी गाठता येणार नाही; परंतु त्यांच्या मोठेपणाला बट्टा लागेल असा व्यवहार कधी माझ्या हातून होणार नाही, असे ते कायम सांगत आणि ते त्यांनी आयुष्यभर जपले.