Maharashtra Assembly Election Survey: सर्व्हे: राज्यात मोठा उलटफेर होणार, भाजप, ठाकरेंना दणका बसणार; आताच निवडणुका लागल्या तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 11:54 AM2024-09-10T11:54:40+5:302024-09-10T11:58:16+5:30
Maharashtra Assembly Election Survey: महाराष्ट्रात आज निवडणुका लागल्या तर काय होईल, महाविकास आघाडी जिंकेल की महायुती, शिंदे चालतील की उद्धव ठाकरे, अजित पवार चालतील की शरद पवार, भाजप की काँग्रेस अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये शोधण्यात आली आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीचा धुरळा खाली पडत नाही तोच महाराष्ट्रात विधानसभेच्या वातावरणाला सुरुवात झाली आहे. शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणून लोकसभेला मविआ आणि महायुतीतील दोन-तीन टक्क्यांच्या मतांचा फरक कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर विरोधक ही योजना राज्याला कशी खड्ड्यात घालणार ते आपले सरकार आले की ते दीड देतायत आम्ही दोन हजार देऊ अशा दोन टोकाचा प्रचार करत सुटले आहे. अशातच महाराष्ट्राचा पहिला सर्व्हे आला आहे.
शिंदे ठाकरेंवर भारी पडणार; पवारांचे काय? विदर्भ, कोकण, महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकणार
महाराष्ट्रात आज निवडणुका लागल्या तर काय होईल, महाविकास आघाडी जिंकेल की महायुती, शिंदे चालतील की उद्धव ठाकरे, अजित पवार चालतील की शरद पवार, भाजप की काँग्रेस अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये शोधण्यात आली आहेत. लोकपोल या संस्थेने हा सर्व्हे केला असून २८८ मतदारसंघाताली सुमारे दीड लाख लोकांचे मत यासाठी विचारात घेण्यात आले आहे.
राज्यात नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागणार आहे. महायुती आणि मविआ अशी थेट लढत अपेक्षित आहे. तरीही प्रकाश आंबेडकर, संभाजी राजे छत्रपती, मराठा आंदोलक अशी तिसरी आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विरोधकांनुसार अजित पवारही त्या जहाजात असू शकतात. तरीही मविआ आणि महायुती असा थेट लढा पाहिला तर २८८ पैकी भाजपाप्रणित महायुतीला ११५ ते १२८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला १४१ ते १५४ जागा मिळताना दिसत आहेत.
म्हणजेच राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इतरांना ५ ते ८ जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. परंतू या पक्षाला ताकदीने प्रचार करावा लागणार आहे. महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची लोकप्रियता वाढली आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कमी झाली आहे.
महायुतीसाठी धक्कादायक बाब....
महायुतीसाठी पर्यायाने भाजपाला धक्कादायक बाब म्हणजे ३८ ते ४१ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला ४१-४४ टक्के मते मिळताना दिसत आहेत. यामुळे लोकसभेप्रमाणेच पुन्हा एकदा मविआला ३-४ टक्क्यांचा आधार मिळणार आहे. ही मते शिंदे-फडणवीसांची सत्ता घालविणारी ठरणार आहेत.