शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा
2
० ते १६१ आमदार, १३ खासदार, २ राज्यात सरकार...; १२ वर्षात कसा होता 'आप'चा प्रवास?
3
अँटीबायोटिक्स वापरणाऱ्यांनी सावधान! २५ वर्षांत ४ कोटी लोकांचा होईल मृत्यू, रिसर्चमध्ये खुलासा
4
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
5
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?
6
"मराठवाड्याला २९ हजार कोटी दिले", CM शिंदेंची माहिती, मराठा समाजाला काय केले आवाहन?
7
Atishi : याला म्हणतात नशीब! 4 वर्षांपूर्वी आमदार अन् आता थेट मुख्यमंत्री
8
कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा वाढदिवशीच मृत्यू, तलावाकाठी पार्टी साजरी करायला गेला अन्...
9
तुरटी करेल भाग्योदय: घरावर अपार लक्ष्मी कृपा, राहुसह वास्तुदोष दूर; ‘या’ उपायांनी लाभच लाभ!
10
PN Gadgil Jewellersच्या आयपीओची धमाकेदार एन्ट्री, ७४% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्या दिवशी मोठा फायदा
11
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
12
Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?
13
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
14
Afcons Infra IPO: ज्या कंपनीनं अबुधाबीत मंदिर उभारलं, अंटरवॉटर मेट्रो तयार केली, त्यांचा येणार IPO; पाहा डिटेल्स
15
अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला CM; मुख्यमंत्री बनताच दरमहिना किती सॅलरी मिळणार?
16
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?
17
रामजी की निकली सवारी, ठेका धरत मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरीची जल्लोषात मिरवणूक सुरू 
18
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
19
मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत
20
साडेतीन तास झोप, सायंकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत अन्...; असं आहे 74 वर्षांच्या मोदींचं डेली रुटीन

Maharashtra Assembly Election Survey: सर्व्हे: राज्यात मोठा उलटफेर होणार, भाजप, ठाकरेंना दणका बसणार; आताच निवडणुका लागल्या तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 11:54 AM

Maharashtra Assembly Election Survey: महाराष्ट्रात आज निवडणुका लागल्या तर काय होईल, महाविकास आघाडी जिंकेल की महायुती, शिंदे चालतील की उद्धव ठाकरे, अजित पवार चालतील की शरद पवार, भाजप की काँग्रेस अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये शोधण्यात आली आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीचा धुरळा खाली पडत नाही तोच महाराष्ट्रात विधानसभेच्या वातावरणाला सुरुवात झाली आहे. शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणून लोकसभेला मविआ आणि महायुतीतील दोन-तीन टक्क्यांच्या मतांचा फरक कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर विरोधक ही योजना राज्याला कशी खड्ड्यात घालणार ते आपले सरकार आले की ते दीड देतायत आम्ही दोन हजार देऊ अशा दोन टोकाचा प्रचार करत सुटले आहे. अशातच महाराष्ट्राचा पहिला सर्व्हे आला आहे. 

शिंदे ठाकरेंवर भारी पडणार; पवारांचे काय? विदर्भ, कोकण, महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकणार

महाराष्ट्रात आज निवडणुका लागल्या तर काय होईल, महाविकास आघाडी जिंकेल की महायुती, शिंदे चालतील की उद्धव ठाकरे, अजित पवार चालतील की शरद पवार, भाजप की काँग्रेस अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये शोधण्यात आली आहेत. लोकपोल या संस्थेने हा सर्व्हे केला असून २८८ मतदारसंघाताली सुमारे दीड लाख लोकांचे मत यासाठी विचारात घेण्यात आले आहे. 

राज्यात नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागणार आहे. महायुती आणि मविआ अशी थेट लढत अपेक्षित आहे. तरीही प्रकाश आंबेडकर, संभाजी राजे छत्रपती, मराठा आंदोलक अशी तिसरी आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विरोधकांनुसार अजित पवारही त्या जहाजात असू शकतात. तरीही मविआ आणि महायुती असा थेट लढा पाहिला तर २८८ पैकी भाजपाप्रणित महायुतीला ११५ ते १२८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला १४१ ते १५४ जागा मिळताना दिसत आहेत. 

म्हणजेच राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इतरांना ५ ते ८ जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. परंतू या पक्षाला ताकदीने प्रचार करावा लागणार आहे. महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची लोकप्रियता वाढली आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कमी झाली आहे. 

महायुतीसाठी धक्कादायक बाब....महायुतीसाठी पर्यायाने भाजपाला धक्कादायक बाब म्हणजे ३८ ते ४१ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला ४१-४४ टक्के मते मिळताना दिसत आहेत. यामुळे लोकसभेप्रमाणेच पुन्हा एकदा मविआला ३-४ टक्क्यांचा आधार मिळणार आहे. ही मते शिंदे-फडणवीसांची सत्ता घालविणारी ठरणार आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस