एकनाथ शिंदे, अजित पवारांसह भाजपाचे ४० स्टार प्रचारक; यादी जाहीर, वाचा कोण आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 03:17 PM2024-03-27T15:17:02+5:302024-03-27T15:18:00+5:30
BJP List of Star Campaigners: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ४० जणांची स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे. त्यात एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याही नावाचा सहभाग आहे.
मुंबई - Star Campaigner of BJP Maharashtra ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या नावांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह ४० नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
कोण आहेत स्टार प्रचारक?
- नरेंद्र मोदी
- जगतप्रकाश नड्डा
- राजनाथ सिंह
- अमित शाह
- नितीन गडकरी
- योगी आदित्यनाथ
- प्रमोद सावंत
- भूपेंद्रभाई पटेल
- विष्णूदेव साय
- मोहन यादव
- भजनलाल शर्मा
- एकनाथ शिंदे
- अजित पवार
- रामदास आठवले
- नारायण राणे
- अनुराग ठाकूर
- ज्योतिरादित्य शिंदे
- स्मृती इराणी
- रावसाहेब दानवे पाटील
- शिवराज सिंह चौहान
- देवेंद्र फडणवीस
- सम्राट चौधरी
- अशोक चव्हाण
- विनोद तावडे
- चंद्रशेखर बावनकुळे
- आशिष शेलार
- पंकजा मुंडे
- चंद्रकांत पाटील
- सुधीर मुनगंटीवार
- राधाकृष्ण विखे पाटील
- पीयूष गोयल
- गिरीश महाजन
- रवींद्र चव्हाण
- के. अण्णामलई
- मनोज तिवारी
- रवी किशन
- अमर साबळे
- विजयकुमार गावित
- अतुल सावे
- धनंजय महाडिक
स्टार प्रचारक म्हणजे काय?
ज्यांच्या भाषणाला ऐकण्यासाठी, ज्यांच्या रॅलीमुळे प्रचंड लोक गर्दी करतात अशा व्यक्तींना स्टार प्रचारक म्हटलं जाते. या स्टार प्रचारकांमुळे त्या पक्षाला मत मिळण्यास फायदा होतो. त्यामुळे निवडणुकीत उभं असणाऱ्या उमेदवारांना वाटते आपल्या प्रचाराला स्टार प्रचारकाने यावे. मात्र त्यांच्या रॅली, सभांवर मोठा खर्च होतो. स्टार प्रचारकाला वेळेअभावी अनेक ठिकाणी सभेला जाण्यास विमान, हेलिकॉप्टरसह अन्य गोष्टी लागतात. त्यामुळे स्टार प्रचारकाचा खर्च हा उमेदवाराच्या निवडणूक खर्चात मोजला जात नाही. हा सर्व खर्च पक्षाकडून होत असतो. त्यामुळे स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाला संधी द्यायची आणि नाही हा निर्णय त्या पक्षाचा असतो.