शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

महायुतीत माढा अन् मविआमध्ये सांगलीचा तिढा; वरिष्ठ नेत्यांची का बनलीय डोकेदुखी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 12:53 PM

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु सांगली जागेवरून शिवसेना उबाठा गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळते. तर माढा जागेवर भाजपाने जाहीर केलेल्या रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर यांच्यासारख्या महायुतीतल्याच नेत्यांनी विरोध केला आहे. 

मुंबई - Sangli and Madha Seat controversy ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपाने २० तर काँग्रेसनं ७ जागांसाठी उमेदवार यादी जाहीर केली आहे. परंतु अद्यापही महायुती असो वा महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला नाही. महायुतीत माढा आणि महाविकास आघाडीतसांगली जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. 

महायुतीने माढा येथून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट देण्यात आली आहे. मात्र या जागेवर धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते. माळशिरसच्या मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील हे लोकसभा उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. परंतु भाजपाने रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यानंतर नाराज झालेले मोहिते पाटील समर्थकांनी गाठीभेटी, बैठकांचा सिलसिला सुरू केला. त्यात रामराजे निंबाळकर यांनीही भाजपा उमेदवारावरनाराजी व्यक्त केली. त्यामुळे माढा इथं उमेदवार बदलणार की मोहिते पाटील समर्थक बंडखोरी करून निवडणुकीत ताकद दाखवून देणार हे पुढील काळात कळेल. परंतु सध्या या जागेवरून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

तर दुसरीकडे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. सांगलीची जागा ठाकरे गट लढवणार असल्याचं चर्चेत आले. त्यानंतर या मतदारसंघातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेत सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून ती जागा टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी घेऊ पण सोडणार नाही असं घोषितच केले. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरची जागा मविआमध्ये ठाकरे गटाची होती. परंतु याठिकाणी सर्वमान्य उमेदवार म्हणून शाहू छत्रपतींनी लढण्याची विनंती केली. त्या विनंतीस मान देऊन शाहूंनी काँग्रेसच्या पंचा चिन्हावर निवडणूक लढवू असं सांगितले. त्यामुळे ठाकरे गटाची ही हक्काची जागा काँग्रेसला दिली. त्या बदल्यात काँग्रेसनं सांगलीची जागा ठाकरे गटाला द्यावी अशी मागणी झाली. 

इतकेच नाही तर ठाकरे गटाने या जागेसाठी उमेदवार म्हणून पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणाही केली. मात्र सांगलीची जागा आमचीच आहे. त्यावर आमचे उमेदवार असतील असं काँग्रेस नेते सांगत आहे. तर या जागेवरून आता आम्ही दिल्लीत चर्चा करू. सांगली जागेवर तोडगा काढला जाईल. याठिकाणी चंद्रहार पाटील उभे राहतील असं वारंवार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सांगतायेत. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात संघर्ष सुरू झाल्याचं चित्र उभं राहिलं आहे. त्यामुळे मविआच्या वरिष्ठ नेत्यांचीही सांगलीच्या जागेवरून डोकेदुखी वाढली आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmadha-pcमाढाsangli-pcसांगली