मुंबई - VBA Second list for LS ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मविआपासून दूर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पहिल्या यादीत पूर्व विदर्भातील मतदारसंघाचा समावेश होता तर दुसऱ्या यादीत वंचितनं मराठवाडा, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे.
हिंगोली - डॉ. बी.डी चव्हाणलातूर - नरसिंहराव उदगीरकरसोलापूर - राहुल काशिनाथ गायकवाडमाढा - रमेश बारस्करसातारा - मारुती धोंडीराम जानकरधुळे - अब्दुल रहेमानहातकणंगले - दादासाहेब चवगौंडा पाटीलरावेर - संजय पंडित ब्राम्हणेजालना - प्रभाकर बकलेमुंबई उत्तर मध्य - अब्दुल हसन खानरत्नागिरी-सिंधुदुर्ग - काका जोशी
अशा ११ उमेदवारांची यादी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली असून त्यात विविध जातीधर्मातील लोकांना स्थान देण्यात आले आहे.
आमच्या ८ जागा काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे पडल्या
मागील निवडणुकीत आमच्या ८ जागा या काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे पडल्या, हिंदू मते मिळाली पण मुस्लीम मते काँग्रेस राष्ट्रवादीने विभागली त्यामुळे आमचा पराभव झाला. जर ही मते आम्हाला मिळाली असती तर आम्हाला ८ जागा जिंकत्या आल्या असत्या असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी नागपूरच्या पत्रकार परिषदेत केला.