शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

भाजपा खासदार नारायण राणेंनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 5:26 PM

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला असून काही ठिकाणी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

मुंबई - Narayan Rane Meet Raj Thackeray ( Marathi News ) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांनी विजय मिळवला. याठिकाणी मविआचे उमेदवार विनायक राऊत यांचा ४७ हजारांच्या मताधिक्याने पराभव झाला आहे. निकालानंतर आज नारायण राणे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी येऊन राज ठाकरेंची भेट घेत त्यांचे आभार मानले. 

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यात नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी पहिलीच सभा कोकणात घेतली होती. नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या संबंध चांगले असल्याने राज ठाकरे कणकवली आले होते. त्याठिकाणी राज ठाकरेंनी राणेंसाठी मते मागितली होती. या निवडणुकीत मनसेचे कार्यकर्तेही महायुतीच्या प्रचारात सक्रीयपणे उतरले होते. त्यामुळे राणे यांनी आज राज ठाकरेंची भेट त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा आमदार नितेश राणे हेदेखील उपस्थित होते. 

राज ठाकरेंनी जिथं सभा घेतल्या तिथं महायुती जिंकली

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या प्रचारात कधी उतरणार अशी उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यानंतर महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे यांनी तीन प्रचारसभा घेतल्या. त्यातील पहिली सभा रत्नागिरी-सिंधुदुर्ग, त्यानंतर पुणे आणि  ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या. रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणे, ठाण्यात नरेश म्हस्के, कल्याण-डोंबिवलीसाठी श्रीकांत शिंदे आणि पुण्यातून मुरलीधर मोहळ या उमेदवारांसाठी राज ठाकरे मैदानात उतरले होते. या सर्व ठिकाणी महायुतीचे उमेदवार जिंकले आहेत. 

ठाण्याच्या खासदारानेही मानले आभार

कृतज्ञ... अतिसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनिधी झाला. मी विद्यार्थीदशेत असल्यापासून ज्या संघटनेला वाहून घेतलं. त्या माझ्या चार अक्षरी जगाला, शिवसेनेला पहिला मानाचा मुजरा करतो. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाशिवाय ही लढाई लढणं शक्य नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी मिळाली. राज साहेब ठाकरे यांनी आमच्यासाठी सभा घेतली तेव्हाच आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला असं सांगत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी राज ठाकरेंचे आभार मानले होते.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Raj Thackerayराज ठाकरेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाMNSमनसेratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग