शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

बुलडाण्याच्या सुपुत्राला लंडनची स्काॅलरशिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 5:06 PM

London Scholarship to Buldana's student : जगभरातील ६० हजार विद्यार्थ्यांमधून भारतातील ४० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

- संदीप वानखडे

बुलडाणा : समाजसेवेचा वसा घेतलेल्या जिल्ह्यातील एका ध्येयवेड्या तरुणाने ब्रिटिश सरकारच्या अत्यंत प्रतिष्ठित असलेली चेव्हेनिंग (Chevening) स्काॅलरशिप मिळिवली आहे. जगभरातील ६० हजार विद्यार्थ्यांमधून भारतातील ४० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील पिंप्री (खंदारे) येथील राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे याचा समावेश आहे. जगभरातील केवळ एक टक्का विद्यार्थ्यांची निवड या स्काॅलरशिपसाठी हाेते. उच्च शिक्षणासाठी जगभरातील १९ विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी राजूची निवड झाली आहे़ जवळपास ४५ लाख रुपयांपर्यंत ही शिष्यवृत्ती मिळणार आहे़लोणार तालुक्यातलं पिंप्री (खंदारे) हे राजू केंद्रे यांचे मूळ गाव. दहावी-बारावीमध्ये चांगले गुण मिळाले आणि भारत विद्यालय बुलडाणा येथे शिकत असताना डॉक्टर होऊन समाजासाठी काहीतरी काम करूया असे विचार त्यांच्या मनात येत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना राजूचा मेळघाटाशी जवळचा संबंध आला. मेळघाटात राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेदरम्यान बालमृत्यू, कुपोषण, रोजगार हमी योजनेवर त्याने काम केले. मुख्यमंत्री फेलोशिप मिळाल्यानंतर राजू केंद्रे याने यवतमाळ येथील पारधीबेडा येथे प्रबाेधनाचे कार्य केले.

अशी झाली निवड

या स्काॅलरशिपसाठी १६० देशांमधून ६३ हजार अर्ज आले हाेते. त्यातील पाच हजार लाेकांनी दाेन राऊंडनंतर मुलाखत दिली. त्यातून १३५० लाेकांची अंतिम निवड झाली़ म्हणजे १.५ टक्के लाेकांची निवड झाली. ही स्काॅलरशीप फाॅरेन काॅमनवेल्थ डिपार्टमेंट देते. राजू केंद्रे हे ज्या विद्यापीठात प्रवेश घेतील त्याची पूर्ण फी व राहणे, तसेच खाण्याचा खर्च शिष्यवृत्तीतून भागविला जाणार आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाScholarshipशिष्यवृत्तीLondonलंडनEducation Sectorशिक्षण क्षेत्र