शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

एटीएमबाहेर लांबच लांब रांगा

By admin | Published: January 09, 2016 3:02 AM

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण स्टेट बँकेत करण्याच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पुकारलेल्या बंदमुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल झाले

मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण स्टेट बँकेत करण्याच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पुकारलेल्या बंदमुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल झाले. या संपामुळे बँकेतील रोख व्यवहार आणि धनादेश वटणे बंद असल्याने ग्राहकांना व्यवहारासाठी सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या स्थितीमुळे एटीएम मशिनबाहेर मात्र ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही बँकांबाहेर पैसे आणि चेक भरण्यासाठी स्वयंचलित मशिन लावण्यात आल्या आहेत. मात्र सायंकाळनंतर मशिनमधील रोख स्वीकारण्याची मर्यादा संपल्यानंतर त्या मशिनही बंद पडल्या. महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनने पुकारलेल्या या संपात राज्यातील २५ सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ८ विदेशी बँका आणि १२ खाजगी बँकांचे सुमारे साडेतीन लाख कर्मचारी सामील झाल्याची माहिती फेडरेशनचे सरचिटणीस विश्वास उटगी यांनी दिली. उटगी म्हणाले की, स्टेट बँकेच्या व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांना संपाचा पवित्रा घ्यावा लागला. हा प्रश्न केवळ विलीनीकरण होणाऱ्या स्टेट बँक आॅफ मैसूर, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ बिकानेर जयपूर, स्टेट बँक आॅफ पटियाला व स्टेट बँक आॅफ त्रावणकोर या पाच सहयोगी बँकांपुरता मर्यादित नाही; कारण या धोरणाला विरोध केला नाही, तर अन्य राष्ट्रीयीकृत बँकांतून कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीत एकतर्फी बदल केले जातील. बँकिंग क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा संकोच करणे व खाजगी बँकांच्या विस्ताराला वाव देणे हे धोरण जोरात रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याविरोधात हा लढा पुकारला असून, आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी संघटनेची देशव्यापी बैठक १४ जानेवारीला चेन्नई येथे होणार असल्याचे उटगी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांच्या थकीत व बुडीत कर्जाची वसुली करण्यासाठी कठोर कायदा तयार करण्याची मागणी घेऊन देशातील ३० हजार बँक कर्मचारी दिल्लीला धडक देणार असल्याचे उटगी यांनी सांगितले. मार्च महिन्यात दिल्लीतील जनपथ ते जंतरमंतर मैदान अशी भव्य रॅली काढून कर्मचाऱ्यांतर्फे राष्ट्रपतींना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आझाद मैदानावर निदर्शनेस्टेट बँकेच्या निर्णयाविरोधात संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात निदर्शने केली. या वेळी स्टेट बँकविरोधात घोषणाबाजी करून संघटनेने दिल्ली आंदोलनाची घोषणा केली.