'हे' असणार विधानसभेसाठी भाजपाचं घोषवाक्य; रावसाहेब दानवेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 06:54 PM2019-07-06T18:54:58+5:302019-07-06T19:52:27+5:30

काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला असून 18 राज्यात काँग्रेस हद्दपार झाली आहे. राज्यात राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे...

'Look at the difference ... back ShivShahi too' BJP's new slogan: Raosaheb Danve | 'हे' असणार विधानसभेसाठी भाजपाचं घोषवाक्य; रावसाहेब दानवेंची माहिती

'हे' असणार विधानसभेसाठी भाजपाचं घोषवाक्य; रावसाहेब दानवेंची माहिती

Next
ठळक मुद्देराज्यभरात काढणार यात्रा

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली असून  ‘दिसतोय फरक... शिवशाही परत’ हा नारा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच राज्यभरात यात्रा काढण्यात येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. 

भारतीय जनता पक्षाच्यावतीने शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात शनिवारी केली. त्यानिमित्त दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार दिलीप कांबळे, जगदीश मुळीक, शहर सरचिटणीस दीपक मिसाळ, नगरसेवक मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. यावेळी दानवे म्हणाले, 1972 नंतर दुसऱ्यांदा बिगर काँग्रेसी सरकार सत्तेत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे चोख नियोजन यामुळे लोकसभेला यश मिळाले. काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला असून 18 राज्यात काँग्रेस हद्दपार झाली आहे. राज्यात राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे. लोकसभा निवडणूका जिंकल्यानंतर आता आम्ही विधानसभेची तयारी सुरु केली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात येत असून राज्यभरात विविध उपक्रम आगामी काळात राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
पुढे बोलताना दानवे म्हणाले,यापुर्वी मिळालेल्या यशापेक्षा अधिक यश विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवू. राज्यात ज्या ज्या ठिकाणी कॉंग्रेस मजबूत अवस्थेत आहे तेथे विशेष लक्ष केंद्रित करुन तेथूनही कॉंग्रेसला हद्दपार करणात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेचे संपादन, मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची तयारी या सरकारच्या जमेच्या बाजू असून काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरकारपेक्षा आम्ही दिलेल्या आश्वासनांची पुर्ती मोठ्या प्रमाणावर केल्याचे दानवे म्हणाले.

15 ऑक्टोबर 2014 रोजी विधानसभेच्या निवडणूका झाल्या होत्या. तीच ‘कट ऑफ डेट’ डोळ्यासमोर ठेवून विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीचे नियोजन केले आहे. 15 ऑक्टोबरपर्यंतचे पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. प्रदेश कार्यकारिणी बैठकीसोबतच शक्ती केंद्रांचे कार्यक्रम, नव मतदार नोंदणी, महिलांसाठी विशेष कार्यक्रम, रक्षाबंधन, महिलांशी संवाद मेळावे, विस्तारक योजना असे कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. सदस्य नोंदणी अभियान पूर्ण झाल्यानंतर कार्यकारिणीमध्ये फेरबदल होणार आहेत. 

Web Title: 'Look at the difference ... back ShivShahi too' BJP's new slogan: Raosaheb Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.