शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

पेट्रोलपंपाच्या मीटरमध्ये फेरफार करून कोट्यवधींची लूट

By admin | Published: May 23, 2017 3:57 AM

त्तर प्रदेश व महाराष्ट्रातील पेट्रोलपंपावरील मीटरमध्ये सॉफ्टवेअर आणि रिमोट कंट्रोलद्वारे फेरफार करून कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या विवेक हरिश्चंद्र शेट्टे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील पेट्रोलपंपावरील मीटरमध्ये सॉफ्टवेअर आणि रिमोट कंट्रोलद्वारे फेरफार करून कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या विवेक हरिश्चंद्र शेट्टे (रा. डोंबिवली, ठाणे) आणि अविनाश मनोहर नाईक (रा. चिंचवड, पुणे) या दोघांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या लखनऊ विशेष कृती दल आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त कारवाईत रविवारी रात्री अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २०१ रिमोट कंट्रोल, ११० मायक्रो चिप, २१० आर एक्स रीसीव्हर अशी पंपावरील मीटरमध्ये फेरफार करणारी यंत्रसामग्री हस्तगत केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. मीटरमध्ये फेरफार करून ग्राहकांना एका लीटरमागे सुमारे १०० मिलिलीटर कमी पेट्रोल देणाऱ्या टोळीविरुद्ध गेल्या दीड महिन्यापासून लखनऊ पोलिसांच्या विशेष कृती दलाचे पोलीस अधीक्षक अमित पाठक, अपर अधीक्षक अरविंद चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाखाली मोठी मोहीम सुरू आहे. यात पोलीस निरीक्षक राजेशचंद्र त्रिपाठी यांच्या पथकाने अजय चौरसिया याला लखनऊ परिसरातून अटक केली. त्याच दरम्यान, पोलिसांनी उत्तर प्रदेशातील २३पेक्षा अधिक पेट्रोलपंपांवर छापे टाकून २० ते २५ जणांना अटक केली. त्या वेळी चौरसियाने विवेक आणि अविनाश या दोघांची नावे उघड केली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि लखनऊ एसपीटीएफचे निरीक्षक त्रिपाठी यांच्या पथकाने या दोघांनाही अटक केली. दोघांनाही ठाणे न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी (ट्रान्झिट रिमांड) दिली आहे.आॅईल कंपन्यांचे अधिकारी सामीलएक हजारांहून अधिक पेट्रोल पंपावर अशा चीप्स लावल्याची माहिती यांच्यातील एका आरोपीने पोलिसांना दिली. हेराफेरीमध्ये वजन मापे विभागाच्या अधिकाऱ्यांसह आॅईल कंपन्यांचे अधिकारीही सामील असल्याची माहिती मिळाल्यानंतर एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी अनेक मशिन उत्तर प्रदेशमधून जप्त केल्या. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी धाडसत्र राबविले. ...........................अशी केली जाते फसवणूकपेट्रोलपंपावरील या हेराफेरीत टोळीतील दोन ते तीनजण सामील व्हायचे. त्यातील एकजण इंधन भरायचा, तर दुसरा पैशाची थैली आणि रिमोट घेऊन उभा असायचा. इंधन भरण्याचे काम सुरु असताना रिमोटद्वारे तो इंधनाचा पुरवठा रोखून धरायचा. मात्र इंधन भरले जात असताना मशिनच्या स्क्रीनवर त्याचा पुरवठा आणि त्याकरिता लागणाऱ्या पैशाची मोजणी सुरु असायची. त्यामुळे ग्राहकाला आपल्या वाहनात पुरेसे इंधन भरले गेलेले नाही, याचा संशय येत नव्हता.......................................................मुंबई, ठाण्यातही सुरु आहे फसवणूकया सॉफ्टवेअरची उत्तर प्रदेशसह देशभरातील अनेक भागांमध्ये विक्री झाल्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबईतील पेट्रोलपंपावर अशाच पद्धतीने इंधनाची चोरी सुरु असल्याची शक्यता गृहीत धरुन ठाणे पोलीस तपास करणार असल्याचे पोलीस आयुक्त सिंग यांनी सांगितले. महिन्याला १५ लाखांची कमाईलखनऊच्या एसटीएफ पथकाने यापूर्वी २७ एप्रिल २०१७ रोजी सात पेट्रोलपंपांवर छापा टाकला होता. त्याचवेळी पेट्रोलपंपातील पुरवठा मशिनमध्ये एक विशिष्ट चिप लावून लीटरमागे १० ते १५ टक्के पेट्रोलची चोरी केली जात असल्याचे उघड झाले. ही चिप तीन हजारांत विकली जात होती. ५०० रुपयांच्या पेट्रोलमध्ये ३० ते ५० रुपयांची चोरी केली जात होती. फेरफार करणारे उच्चशिक्षित पंपावरील फेरफार करणारे सॉफ्टवेअर बनविणारा शेटे हा एमएस्सी इलेक्ट्रॉनिक्स आहे तर रिमोट तयार करणारा नाईक हा पुण्याच्या चिंचवडमध्ये रिमोटचे उत्पादन करीत होता. या जोडगोळीने शेकडो पंपांना हे सॉफ्टवेअर आणि रिमोट विकून मोठी कमाई केली.