शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

नळांना तोट्या बसवा... पाणी वाचवा!

By admin | Published: May 14, 2016 2:58 AM

सध्याचे जलसंकट लक्षात घेता ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन राज्यभरात पाणी बचतीसाठी नळांना तोट्या बसविण्याची मोहीम सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबई : सध्याचे जलसंकट लक्षात घेता ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन राज्यभरात पाणी बचतीसाठी नळांना तोट्या बसविण्याची मोहीम सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सातारा, सोलापूर, औरंगाबाद आदी शहरात हे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.पाण्याचे महत्त्व आता कळून चुकल्याने सातारा शहरातील युवक, महिला पाणी बचतीसाठी विविध उपाय करत आहेत. निमिश शहा यांनी शहरातील विविध भागांतील नळांना तोट्या बसवून वाया जाणारे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.जलसाक्षरतेसाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘जलमित्र अभियाना’ला विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे पाण्याचे मोल समजू लागले आहे. त्यामुळे पाणी बचतीची चळवळ सुरू झाली आहे. ‘जलमित्र अभियान’अंतर्गत साताऱ्यातील निमिश शहा यांनी मित्रांना घेऊन सदर बझार येथील हौसिंग सोेसायटी, बंगले, झोपडपट्टी या भागात फिरून तोट्या नसलेल्या नळांचा सर्व्हे केला. त्यानंतर एक प्लंबर बरोबर घेऊन त्यांनी जवळपास वीस नळांना तोट्या बसविल्या. जलसाक्षरतेसाठी औरंगाबाद येथील जलमित्र समोर आले आहेत. ज्यांच्याकडील नळाची तोटी खराब असेल, पाईपमधून पाणी गळत असेल, अशा नागरिकांनी जर या जलमित्रांना फोन केला तर हे जलमित्र येऊन कोणतेही शुल्क न घेता ते दुरुस्त करून देत आहेत. शेकडो लिटर पाणी वाया जाऊ नये, यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात औरंगाबादचे मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आवाहन केले आहे की, नळाची तोटी खराब आहे, तिची दुरुस्ती होत नसल्याने शेकडो लिटर पाणी वाहून जात आहे. दुरुस्तीअभावी जर पाणी वाया जात असेल तर हे दुर्दैव आहे. यासाठी आम्ही प्लंबरचे पथक तयार केले आहे.सोलापुरात शाब्दी सोशल ग्रुपच्या वतीने सार्वजनिक नळांना तोट्या बसविण्याची मोहीम हाती घेतली. आजवर या ग्रुपच्या वतीने किशननगर, मौलाली चौक, कुर्बान हुसेननगर आदी भागातील ७० नळांना तोट्या बसविण्यात आल्याची माहिती रसूल पठाण यांनी ‘लोकमत’ ला दिली. (प्रतिनिधी)पाणीटंचाई यू ट्यूबवर : पाणीटंचाईच्या दाहकतेचे चित्र समोर येण्यासाठी जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयातील स्वराज्य पथनाट्य गु्रपच्या काही तरुणांनी एकत्रित येऊन जनजागृतीपर गाण्याचा व्हिडीओ यू ट्यूबवर अपलोड केला आहे. यू ट्यूबवर ‘सेव्ह द ट्री, सेव्ह द वॉटर, एमजेसी जळगाव’ ही लिंक टाकल्यास हा चार मिनिटांचा व्हिडीओ पाहावयास मिळतो. सध्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर देखील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.लक्षवेधी : जागतिक तज्ज्ञांच्या मते भारताची लोकसंख्या २०२५ पर्यंत १५० कोटी होणार आहे. माणसाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी माणसी १५० लिटरपेक्षा अधिक पाणी वापरलं जातं. नागपूर, पुणे आणि मुंबईसारख्या शहरात हेच प्रमाण २०० लिटरपर्यंत आहे. पाण्याचा असाच वापर होत राहिल्यास पाणी समस्या आणखी उग्र होणार आहे.