नेरळ : सतत आठवडाभर कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने पोशीर नदीला पूर आल्याने गुरु वारी रात्री ११ च्या सुमारास पोशीर - माले रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे या रस्त्याची माती शेतात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन वर्षांपूर्वी हा रस्ता खचून शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. परंतु रस्त्याची जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुरु स्ती केली नसल्याने पुन्हा खचला असून हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील पोशीर ते माले या तीन किलोमीटर रस्ता असून पोशीर नदीजवळ हा रस्ता गुरु वारी ११ वाजता मोठ्या प्रमाणात खचला. माले येथील ग्रामस्थ योगेश वेहले आणि संदीप वेहले हे रात्री दुचाकीवरून घरी येत असताना रस्त्यावरून पुराचे पाणी जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी पाणी कमी होईपर्यंत थांबावे लागले. पाणी कमी झाल्यानंतर त्यांना हा रस्ता खचल्याचे लक्षात आले. रस्ता खचून रस्त्यांची माती शेतात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा नेरळ-कळंब रस्त्याला जोडणारा पोशीर-माले-आर्ढे हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत आहे. दोन वर्षापूर्वीही हा रस्ता खचला होता. परंतु दोनवर्षे उलटूनही बांधकाम विभागाने यावर कोणतीही डागडुजी केली नव्हती. यासंदर्भात तत्कालीन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता बी. बी. कुराडे यांनी रस्त्याची पाहणी करु न या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी अंदाजपत्रकीय रक्कम ४ लाख १० हजार रु पयांचा दुरु स्ती प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु दोनवर्षातही रस्त्याचे काम करता आले नाही. बांधकाम विभागाकडून हा निधी अपूर्ण पडत असल्याने या रस्त्याचे काम करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. रस्त्याच्या कडेला ज्या शेतकऱ्यांची शेती आहे त्या शेतकऱ्यांची रस्त्याला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी असल्याने हे काम केले नसल्याचे सांगण्यात आले आहे.रस्ता वाहतुकीस धोकादायक असल्याने या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये याची काळजी घेऊन प्रकाश फरात यांनी स्वखर्चाने मातीचा भराव टाकला होता. परंतु हा भराव सुद्धा पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने लवकरात चांगल्या दर्जाचा रस्ता तयार करु न रस्त्यात संरक्षण भिंत उभारावी अशी मागणी शेतकरी, स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांकडून केली जात आहे. हा रस्ता दोन वर्षांपासून खचल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे. >दुरु स्तीचा प्रस्तावरस्त्याच्या दुरु स्तीसंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु हा निधी कमी प्रमाणात असल्याने चांगल्या दर्जाचे काम करता आले नसते. त्यामुळे पुन्हा खचलेल्या रस्त्याची पाहणी करु न रस्त्याची रुं दी वाढवून, रस्त्याला संरक्षण भिंत उभरता येईल अशा प्रकारे नवीन प्रस्ताव तयार करु न जि. प. बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल असे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी उप अभियंता ए. ए. केदार यांनी सांगितले.
रस्ता खचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
By admin | Published: September 24, 2016 2:47 AM