शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

प्रशिक्षणाच्या नावाखाली लाटला लाखोंचा निधी

By admin | Published: January 16, 2017 3:25 AM

२०१४-१५ च्या दरम्यान स्पर्धा परीक्षांचे आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली औरंगाबादच्या प्रज्ञा बहुउदेशिय सेवाभावी संस्थेने लाखोंचा निधी लाटला आहे.

रवींद्र साळवे,

मोखाडा- जव्हार प्रकल्पच्या न्यूक्लिअस बजेटच्या अंतर्गत २०१४-१५ च्या दरम्यान स्पर्धा परीक्षांचे आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली औरंगाबादच्या प्रज्ञा बहुउदेशिय सेवाभावी संस्थेने लाखोंचा निधी लाटला आहे.अनुसूचित जमातीच्या विद्यार्थांना स्पर्धा परीक्षेचे महत्व कळावे, व्यक्तिगत विकास घडावा व स्पर्धा परीक्षेच्या सर्व विषयाची तयारी करण्यासाठी जव्हार प्रकल्पाने २०१५ मध्ये ४ लाख ९५ हजाराचे अनुदान तीन महिन्याच्या प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून दिले होतेत्या अनुषंगाने या संस्थेने मोखाडा येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील ७५ विद्यार्थांना थातुर-मातूर १ महिना कसेबसे प्रशिक्षण देऊन व कागदोपत्री तीन महिन्याचे प्रशिक्षण दिल्याचे दाखवून लाखोंचा निधी गिळंकृत केला आहेप्रत्येक विदयार्थ्याचे प्रशिक्षण शुल्क रु. ३,५०० प्रमाणे एकूण २ लाख ६२ हजार ५०० रु खर्च दाखविण्यात आला आहे. अभ्यास व साहित्य यासाठी २००० प्रमाणे एकूण १ लाख ५०,००० हजार, ३० उपयुक्त सराव चाचण्या व शारीरिक चाचण्या यासाठी ८२ हजार ५०० रु पये खर्च केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे.तसेच मुलांना इतिहास, भूगोल, राज्यघटना, राज्यशास्त्र, पंचायत राज, राज्यघटना, गणित बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी, व्याकरण, जनरल विषय आदी विविध प्राध्यापकानी मुलांना १७ जानेवारी ते १७ एप्रिल २०१५ च्या दरम्यान शिकवल्याचेही दाखवले आहे.मात्र याबाबत आदिवासी शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची भेट घेतली असता इतिहास, भूगोलच कसेबसे शिकविले असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. तसेच एका महिन्याच्या हजेरीच्या नोंदी एकदाच करून घेतल्या असल्याचेही सांगितले व कागदपत्रे मात्र सर्वच जमा करून घेतली होती शारीरिक चाचण्या कोणत्याच घेतल्या नव्हत्या. बक्षिसाचे आमिष दाखवून एक वेळेस सराव परीक्षा फक्त घेतली होती. त्यानंतर बक्षिसही दिले नाही की परत कुणीच फिरकून सुद्धा पाहिले नाही यामुळे या प्रशिक्षणाच्या नावाखाली तत्कालीन अधिकाऱ्यांच्या संगनमताने या संस्थेने आदिवासी विद्यार्थ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम केले आहे. यामुळे हा निधी खर्च करण्यामागचा उद्देश व्यर्थ ठरला आहे. तसेच या अनुदानाची रक्कम दोन टप्यात दिली जाणार असताना ही रक्कम एकदाच संस्थेच्या अध्यक्षांच्या वैयक्तिक खात्यात जमा केली गेली असून योजना राबवितांना योजनेच्या अटी व शर्तीना पूर्णपणे बगल दिली गेली आहे. यामुळे अशा भ्रष्ट संस्था चालकांवर व त्यांच्या संगनमताने भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. >नियम डावलून हे अनुदान दिलेच कसे ?प्रज्ञा बहुउद्देशिय संस्थेची२०१४ ची नोंदणी असूनही जव्हार प्रकल्प कार्यालयाने निधी दिला कसा ?प्रज्ञा बहुउदेशिय संस्थेचा नोंदणी क्र ं ७४५/१४ असून सन २०१५ मध्ये जव्हार प्रकल्प कार्यालयाने न्यूक्लिअस बजेटच्या अंतर्गत ४ लाख ९५ हजाराचे अनुदान स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यासाठी दिले आहे.प्रज्ञा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने आम्हाला स्पर्धा परीक्षांचे सर्वंकष प्रशिक्षण देण्यात येणार होते. प्रत्यक्षात मात्र थातूर-माथूर पद्धतीने १ महिना कसे बसे शिकवले . स्टडी मटेरियलच्या नावाखाली एक पुस्तक दिले होते . एकदाच एक सराव चाचणी घेतली होती आणि एका महिन्याच्या हजेरीच्या सह्या एकदाच करून घेतल्या होत्या. या प्रशिक्षणात स्पर्धा परीक्षांचे संपूर्ण ज्ञान दिले जाईल, असे सांगितले परंतु आम्हाला समजेल असे काहीच शिकवले नाही यामुळे या प्रशिक्षणाबद्दल मुलांमध्ये नाराजी होती. - चंद्रकांत मौळे, विद्यार्थी - टी.वाय.बी.ए (आदिवासी वसतिगृह मोखाडा) आम्ही या मुलांना या प्रशिक्षणामध्ये चांगल्या प्रकारे ४५ दिवस शिकवले आहे यातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांचा नक्कीच फायदा होईल. - हर्षवर्धन इंगळे - अध्यक्ष (प्रज्ञा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, औरंगाबाद)