शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

आगे आगे देखो होता है क्या...दिग्गजांच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:55 PM

आज किंवा उद्या भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक जागा जिंकण्याचा दावा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातले दिग्गज नेते भाजपात येणार असल्याचे सुतोवाच करत 'आगे आगे देखो होता है क्या' असा इशारा दिला आहे. तसेच आज किंवा उद्या भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. 

प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील एकूण लोकसभेच्या जागांपैकी रेकॉर्ड ब्रेक जागा जिंकण्याचा दावा केला. तसेच विरोधी पक्षांचे अनेक दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर असून वाट पाहण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यावर शरद पवार काय बोलले मला माहिती नाही, पण त्यांनीच विपर्यास केल्याचेही म्हटले आहे. यामुळे एकूणच ते संभ्रम स्थितीमध्ये असल्याचे दिसत असल्याचा आरोप त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला. तसेच हवाई हल्ला झाल्याचे मान्य केले तर त्याचे श्रेय मोदींना जाईल याचीही त्यांना भीती असल्याचे फडणवीस म्हणाले. 

लोकसभेसाठी शिवसेनेसोबत युती करताना आरपीआयचे रामदास आठवलेंच्या पक्षाला विचारात घेतले नसल्यावरूनही फडणवीस यांनी खुलासा केला. ते म्हणाले, रामदास आठवले यांच्या पक्षाला लोकसभेत जागा दिली जाणार नाही. पण विधानसभेत त्यांचे व्यवस्थित समाधान करणार आहे. 

 

राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार  विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते हे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. उद्या मंत्रालयासमोरील महिला सभागृहात रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मात्र, रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलेलं नसल्याचे समजत आहे. 

काही दिवसांपूर्वी रणजितसिंह मोहिते-पाटलांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते भाजपात प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील घराण्याची असलेली ताकद पाहता भारतीय जनता पार्टीकडून मोहितेंना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याच पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते पाटील यांचा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक