शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

गिरणी कामगारांसाठी लॉटरी २२ एप्रिल रोजी

By admin | Published: April 19, 2016 3:50 AM

गिरणी कामगारांच्या २ हजार ६७८ घरांसाठीची जाहिरात २२ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वसामान्य मुंबईकरांसाठीच्या सुमारे एक हजार घरांसाठीच्या लॉटरीची जाहिरात

मुंबई : गिरणी कामगारांच्या २ हजार ६७८ घरांसाठीची जाहिरात २२ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वसामान्य मुंबईकरांसाठीच्या सुमारे एक हजार घरांसाठीच्या लॉटरीची जाहिरात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार आहे.वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात ‘म्हाडातील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या एक वर्षाच्या बालसंगोपन’ रजेबाबत माहिती देण्यासाठी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत म्हाडाचे उपाध्यक्ष एस.एस. झेंडे यांना प्रसारमाध्यमांनी घरांच्या लॉटरीबाबत विचारले. यावर झेंडे यांनी गिरणी कामगार आणि सर्वसामान्यांच्या घरांच्या लॉटरीचीही माहिती दिली.झेंडे म्हणाले की, ‘पहिल्यांदा गिरणी कामगारांसाठीच्या घरांच्या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर, सर्वसामान्य घरांसाठीच्या लॉटरीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.’मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून पहिल्या आठवड्यात या घरांची लॉटरी निघेल. सर्वसामान्यांसाठी सुमारे एक हजार घरे असण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावमध्ये लॉटरीसाठीची सर्वाधिक घरे असणार असून, गोरेगाव येथील सिद्धार्थनगर एक आणि दोनमधील घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)