शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

लोटला जनसागर !

By admin | Published: November 01, 2014 1:05 AM

वानखेडे मैदानावर शुक्रवारी लोटलेल्या गर्दीला कुठल्या निकालाची उत्सुकता नव्हती, तर हे सारे जण विजयोत्सव साजरा करण्यासाठी आले होते.

वानखेडे मैदानावर शुक्रवारी लोटलेल्या गर्दीला कुठल्या निकालाची उत्सुकता नव्हती, तर हे सारे जण विजयोत्सव साजरा करण्यासाठी आले होते. राज्याचे 18वे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि गर्दीने खच्चून भरलेल्या वानखेडेवर एकच जल्लोष झाला. अवघ्या काही मिनिटांच्या या शपथविधीसाठी राज्यभरातून आलेल्या जनसागरामुळे कार्यक्रमस्थळी काहीशी गैरसोय झाली खरी, मात्र त्यानंतरही उपस्थितांनी त्यातून मार्ग काढत याचि देही, याचि डोळा हा आनंद सोहळा अनुभवला!
 
ज्या वानखेडेवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे चौकार आणि षटकार पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांची गर्दी व्हायची; त्याच सचिनच्या होमपीचवर शुक्रवारी राजकारण्यांची गर्दी झाली होती. निमित्त होते ते महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 1क् मंत्र्यांच्या शपथविधीचे.
अल्पमतात का होईना; सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नात असलेल्या भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात सर्वाधिक म्हणजे 122 जागा जिंकल्या आणि मग राज्यात सत्तेचा सारीपाट सुरू झाला. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी हातमिळवणी करायची की नाही? यासंदर्भातील वादळ अद्याप शमले नसले, तरी शुक्रवारी वानखेडेवर रंगलेल्या शपथविधी सोहळ्याचे क्षण डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी क्रिकेटच्या या पंढरीत राजकीय पक्षांचे मावळे दाखल झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील असल्याने हा सोहळा पाहण्यासाठी विदर्भवासी मोठय़ा प्रमाणावर येथे दाखल झाले होते. विशेषत: यामध्ये फडणवीस यांच्या शाळकरी आणि महाविद्यालयीन मित्रंचा भरणा अधिक होता. शिवाय आमदार पंकजा मुंडे यांचाही मंत्रिमंडळातील समावेशाने त्यांना शपथ घेताना पाहण्यासाठी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निष्ठावान असे मराठवाडय़ातील कार्यकर्ते येथे मोठय़ा प्रमाणावर दाखल झाले होते. पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि कोकणातून येथे येणा:या कार्यकत्र्याची संख्या कमी असली तरी ही कसर मुंबई शहर आणि उपनगरातील कार्यकत्र्यानी भरून काढली. दुपारी 2 वाजेर्पयत मुंबईच्या उपनगरातील भाजपाचे कार्यकर्ते खासगी बसद्वारे वानखेडेकडे रवाना होत होते. यात 
महिला कार्यकत्र्याचाही मोठय़ा प्रमाणावर 
समावेश होता. दुपारी 12 वाजेर्पयत रिकामा असणारा वानखेडेबाहेरील परिसर नंतर कार्यकत्र्यानी फुलून गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची उडालेली धावपळ. अशा या गराडय़ात शपथविधीची रंगत उत्तरोत्तर वाढतच गेली. दरम्यान, वानखेडे मैदानात प्रवेशासाठी कार्यकत्र्यानी शिस्तबद्ध अशी लावलेली रांग, ‘स्वच्छ भारत’ अभियानाचे भान ठेवत कोठेही कचरा होणार नाही याची घेतलेली काळजी, मोदी यांच्या नावाचा जयघोष.. अशा सा:याने हा परिसर सायंकाळी उशिरार्पयत दणाणून गेला होता.
 
रंगत उत्तरोत्तर वाढतच गेली
दुपारी 12 वाजेर्पयत तुरळक रिकामा असणारा वानखेडेबाहेरील परिसर नंतर मात्र कार्यकत्र्यानी फुलून गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा होणारा वर्षाव आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची उडालेली धावपळ, अशा या गराडय़ात शपथविधीची रंगत उत्तरोत्तर वाढतच गेली.
 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 
देवेंद्र हे अभ्यासू व हुशार आहेत. त्यांना राज्याच्या प्रश्नांचा अभ्यास आहे. त्यांच्याकडून राज्याच्या विकासाला निश्चित गती मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. फडणवीस यांची समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीची धडपड मला महत्त्वाची वाटते. महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे बनावे, या शब्दांत अण्णा हजारे यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. 
 
शपथविधी सभारंभाला भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई, मुली शारदा चौधरी आणि अॅड. रोहिणी खेवलकर उपस्थित होत्या. शपथ घेणा:या मंत्र्यांच्या कुटुंबीयांसाठी जी जागा आरक्षित होती, तिथे भाजपाचे अन्य नेते बसले होते. त्यामुळे बसायला जागाच नसल्याने खडसे यांचे कुटुंबीय ताटकळत उभे राहिले. त्यांनी वारंवार विनंती करूनही त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. शेवटी मंदाताईंनी खा. किरीट सोमय्यांना विनंती केली. तेव्हा सोमय्यांनी त्यांना दुसरीकडे जागा पाहून बसा, असा सल्ला दिला. एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. 
 
1वानखेडे स्टेडियमच्या गेट नंबर 4वर वाढती गर्दी पाहून पोलिसांनी गेटच बंद केले. आत जागा नसल्याचे सांगत पोलिसांनी लोकांना गेटबाहेरच रोखून धरले. जागा नसल्याची बतावणी करणा:या पोलिसांनी तासाभराने पुन्हा दरवाजे उघडले आणि पुन्हा झुंबड उडाली. समर्थकांसह प्रवेश करू पाहणा:या भाजपा आमदारांना पोलिसांनी अडवले. माजी मंत्री बबनराव पाचपुते आत जाऊ शकले नाहीत. 
 
2सोहळ्यातील प्रवेशासाठी करण्यात आलेली पास व्यवस्था पूर्णपणो कोलमडल्याचे चित्र होते. त्याचा दिग्गजांना फटका बसला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना तर चक्क भाजपा कार्यालयात जाऊन प्रवेशाचे पास मागावे लागले. प्रत्येक आमदाराला 1क्क् पास देण्याचे ठरले असताना प्रत्यक्षात 5क् पासही देण्यात आले नाहीत. 
 
3या अव्यवस्थेचा फटका मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रींनाही बसला. सोहळ्यासाठी आलेल्या सरिता फडणवीसांना घ्यायला कोणीही भाजपा नेता, पदाधिकारी तेथे हजर नव्हता. ही बाब काही पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर उपस्थित भाजपा पदाधिका:यांनी धावपळ केली. त्यानंतर सरिता फडणवीस यांना आणण्यासाठी कार्यकर्ते गेले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या औपचारिक हस्तांदोलनानंतर काही वेळ चर्चा झाली. पंतप्रधानांचा हात चव्हाणांच्या खांद्यावर विसावल्याचे दृश्य पाहायला 
मिळाले. यावर मोदींचा हात सांत्वनासाठी होता का, अशी चर्चा रंगली. 
 
आनंददायी हितगुज
शपथविधी सोहळ्याच्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्या व्यस्त आणि गडबडीच्या वेळीही थोडय़ा वेळासाठी का होईना ते प}ी अमृता फडणवीस यांच्या शेजारी बसले होते. तो आनंददायी माहोल अनुभवत असतानाच क्षणभरासाठी का होईना दोघांनी एकमेकांशी हितगुज केले.
 
हत्तीवरून वाटली मिठाई
हत्तीवरून साखर वाटणो, या म्हणीचा तंतोतंत अनुभव घेतला तो खोपोलीकरांनी. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली आणि खोपोलीत चक्क हत्तीवरून मिठाई वाटण्यात आली. महाराष्ट्रातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची निवड झाल्याचा आनंद असा साजरा केला.
 
सर्वाचीच गर्दी!
विदर्भातील नेता मुख्यमंत्री बनत असल्याने शुक्रवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यासाठी विदर्भातून आणि राज्यातील इतर भागांतून मोठय़ा प्रमाणात भाजपा कार्यकर्ते सोहळ्यासाठी आले. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी भाजपाचे पदाधिकारी, सेलीब्रिटी आणि अन्य व्यक्तींनाही निमंत्रण असल्याने त्यांनीही मोठय़ा संख्येने सोहळ्याला हजेरी लावली. सायंकाळी 4 वाजता सोहळा होणार असल्याने भाजपाचे कार्यकर्ते दुपारी 2 वाजल्यापासूनच वानखेडे स्टेडियमच्या दिशेने जात होते.
 
कलाकारांचा साधेपणा
या सोहळ्याला येताना कुठला बडेजाव न ठेवता मराठी कलाकारांनी साधेपणाच जपण्याचे काम केले. 
4 नंबर गेटमधून आणि इन्कमटॅक्सच्या समोरून असणा:या वानखेडेच्या गेटमधून सर्वसामान्यांना आत सोडण्यात येत असल्याची माहिती नसल्याने त्या गेटमधून मराठी कलाकार आत जात होते. मात्र अति महत्त्वाच्या आणि सेलीब्रिटींसाठी 
2 आणि 3 नंबर गेटमधून एन्ट्री असल्याचे समजताच पुन्हा त्या गेटकडे सगळे धाव घेत होते.
 
स्वप्न 
साकार झाले !
महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शपथ घेतली. या ऐतिहासिक सोहळ्याच्या वेळी त्यांची आई सरिता फडणवीस उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी आईला असे आलिंगन दिले. या वेळी जणू स्वप्न साकार झाले अशा भावना त्यांच्या चेह:यावर होत्या.
 
बहिणीच्या पाठीवर थाप  !
नाराजी नाटय़ानंतर उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्याला वानखेडे मैदानावर दाखल झाले. कार्यक्रम झाल्यानंतर आवर्जून त्यांनी बहीण मानत असलेल्या पंकजा मुंडे हिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. या वेळी आरपीआयचे नेते रामदास आठवले बाजूलाच उभे राहून कौतुकाने हे दृश्य न्याहाळत होते.
 
सांस्कृतिक कार्यक्रम 
वानखेडे मैदानावरील शपथविधी सोहळ्याच्या आधी व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. अशोक हांडे आणि त्यांच्या सहका:यांनी ही  मैफील रंगवली. त्यामुळे दुपारपासून कार्यक्रमासाठी मैदानात दाखल झालेल्यांचे चांगले मनोरंजन झाले. 
 
अन् नाना संतापला..
शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर वानखेडे स्टेडियमच्या गेट क्रमांक 3वर आले. गेटवरील प्रचंड गर्दी, रेटारेटी आणि अव्यवस्थेमुळे नानाचा पारा चांगलाच चढला. संतापलेल्या नानाने स्वत:चा विशेष पास परत केला आणि सभारंभाला उपस्थित न राहताच माघारी परतले.