शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
7
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
8
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
9
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
10
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
11
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
12
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
13
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
14
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
15
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
16
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
17
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
18
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
19
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
20
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

फेसबुकवरील प्रेमाचा तरुणीकडून इन्कार

By admin | Published: July 25, 2016 2:21 AM

दोन वर्षापूर्वी फेसबुकवरील प्रेमाचा स्वीकार करुन विवाहाला तयार झालेल्या तरुणीने जेव्हा तो तरुण कतारमधील नोकरी सोडून पुण्यात आला़ तेव्हा मात्र, त्याला नकार देऊन दुसऱ्या तरुणाबरोबर

पुणे : दोन वर्षापूर्वी फेसबुकवरील प्रेमाचा स्वीकार करुन विवाहाला तयार झालेल्या तरुणीने जेव्हा तो तरुण कतारमधील नोकरी सोडून पुण्यात आला़ तेव्हा मात्र, त्याला नकार देऊन दुसऱ्या तरुणाबरोबर आपले लग्न ठरल्याचे सांगितल्यावर त्याला धक्काच बसला़ त्यामुळे चिडलेल्या तरुणाने तिला रस्त्यात आडवून बराच वेळ थांबवून ठेवले. तिला जीवे मारण्याची धमकी देत तरुणीला त्रास देऊ लागला. डेक्कन पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर त्या तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या.अ‍ॅन्टो कॅरल लिज्यु (वय २५, रा. केरळ, सध्या-भोसरी) असे त्याचे नाव आहे. याबाबत २३ वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षापूर्वी अ‍ॅन्टो सोबत या युवतीची फेसबुकवरून ओळख झाली. अ‍ॅन्टो हा कतारमध्ये एका कंपनीत असिस्टंट एचआर म्हणून नोकरीला होता. युवतीशी फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर त्यांच्यात संभाषण वाढले. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. अ‍ॅन्टोचा भाऊ पुण्यात असतो. त्यामुळे दोघांमध्ये विवाहासंदर्भात बोलणी झाली.युवतीसाठी तो कतार येथील नोकरी सोडून दोन महिन्यांपूर्वी पुण्यात राहण्यासाठी आला. पण, त्याला युवतीची दुसऱ्याबरोबर मैत्री झाल्याचे समजले. तसेच, तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. त्यामुळे अ‍ॅन्टो त्रासला होता़(प्रतिनिधी)