शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
Google Pay, PhonePe आणि Paytm युझर्स लक्ष द्या, १ नोव्हेंबरपासून UPI पेमेंटमध्ये होणार २ बदल
6
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
7
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
8
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
9
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
10
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
11
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
12
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
13
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
14
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
15
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
16
शिंदे - अजित पवारांना संपविण्याची भाजपची खेळी, मविआमध्ये वाद नाहीत - रमेश चेन्नीथला 
17
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
18
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
19
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
20
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल

यंदा जुलैमध्ये 10 वर्षांतील सर्वाधिक कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2017 5:36 PM

जुलै महिन्यात मुंबईत ८६९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण 2008  पासूनचे तिसर क्रमांकाचे सर्वात कमी प्रमाण आहे. तर​ यंदा 17 जुलै हा दिवस गेल्या तीन वर्षांतील सर्वात ओला दिवस ठरला आहे. 

मुंबई, दि. 2 - जुलै महिन्यात मुंबईत 869.6  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण 2008  पासूनचे तिसर क्रमांकाचे सर्वात कमी प्रमाण आहे. तर​ यंदा 17 जुलै हा दिवस गेल्या तीन वर्षांतील सर्वात ओला दिवस ठरला आहे.  सांताक्रूझ वेधशाळेनं 1 जून ते  31 जुलै या कालावधीत 1,3928 मि.मी. पावसाची नोंद केली. जून 2017  मध्ये 523.2  मि.मी. पाऊस झाला. तर यंदाचा 17 जुलै हा दिवस गेल्या तीन वर्षांतला सर्वात ओला दिवस ठरला आहे. तर मराठवाड्यात यंदा 1 जूनपासून जुलैअखेरपर्यंतच्या पावसात 21 टक्के तूट आहे.

तलावांमध्ये ८५ टक्के जलसाठादरम्यान, पाण्यासाठी वणवण करणा-या मुंबईकरांसाठी यंदाच्या मान्सूनने सुखद दिलासा दिला आहे. दोनच पावसाळी महिन्यांत मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये 85 टक्के जलसाठा जमा झाला आहे. वर्षभरासाठी पाण्याची कटकट मिटण्याकरिता आणखी अडीच लाख दशलक्ष लीटर जलसाठा जमा होण्याची गरज आहे.

सन २०१५मध्ये अपु-या पावसामुळे पाणीप्रश्न पेटला होता. गेल्या वर्षी मात्र तलावांमध्ये तुलनेत चांगला पाणीसाठा होता. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तलावांमधील जलसाठ्याची स्थिती उत्तम होती. त्यात मुसळधार सरी सतत तलाव परिसरात हजेरी लावत असल्याने पावसाळ्याच्या दीड महिन्यातच पाणीप्रश्न सुटला आहे. काही दिवसांतच सर्व धरणं भरून वाहण्याच्या स्थितीत आहेत. मुंबईला वर्षभर चांगला पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये 1 आॅक्टोबर रोजी 14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे. मुसळधार पावसामुळे सर्व प्रमुख तलावांमध्ये एकूण 12 लाख 21 हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. 85 टक्के जलसाठा जुलै महिन्यातच जमा झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.