पुणे : सायंकाळनंतर सुटणारे बोचरे वारे, त्याच्यासोबत कडाक्याची थंडी यामुळे पुणेकर सध्या गारठून गेले असून, या हंगामातील सर्वांत नीचांकी किमान तापमान ९़४ अंश सेल्सिअस गुरुवारी नोंदविले गेले आहे़गेल्या काही दिवसांत शहरातील तापमानात सातत्याने चढउतार दिसून येत होता़ गेल्या शनिवारी या हंगामातील सर्वांत कमी किमान तापमान १०़१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़ त्यात सोमवारी वाढ होऊन ते ११़१ अंश सेल्सिअस झाले होते़ त्यात गेल्या दोन दिवसांत पुन्हा घट झाली़ बुधवारी १०़८ अंश सेल्सिअस नोंद झाली. त्यात गुरुवारी एक अंशाहून अधिकने घट होऊन ते ९़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ शुक्रवारी त्यात आणखी घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़>श्वसनावर परिणामघटत्या तापमानाबरोबरच हवेतील प्रदूषणही वाढलेआहे. त्यामुळे काही जणांना श्वसनाचाही त्रास होताना दिसून येत आहे.थंडीमुळे हवेत धूळ, कार्बन यांचे कण साठून राहत आहेत. त्याचा परिणाम श्वसनप्रक्रियेवर होत आहे.>डिसेंबर महिन्यातील पुण्यातील किमान तापमान११ डिसेंबर २०१६ ८़३२६ डिसेंबर २०१५ ६़६२९ डिसेंबर २०१४ ७़८१४ डिसेंबर २०१३ ६़८२७ डिसेंबर २०१२ ७़४२७ डिसेंबर २०११ ७़६२० डिसेंबर २०१० ६़५२५ डिसेंबर २००९ ८़५२५ डिसेंबर २००८ ८़६७ डिसेंबर २००७ १०़९२७ डिसेंबर १९६८ ३़३
पुणे गारठले, हंगामातील नीचांकी किमान तापमानाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 1:33 AM