नागपूर : राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी चंद्रपूर जिल्हा दारूबंदीच्या निर्णयाविरुद्ध दाखल पाच रिट याचिका फेटाळून लावल्या. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला.महाराष्ट्र दारूबंदी कायदा-१९४९मधील तरतुदीनुसार राज्यात दारूबंदीचे धोरण अस्तित्वात आहे. राज्य शासनाने आपल्या अधिकाराखाली काही भागांना यातून वगळून यथायोग्य दारूविक्रीचे परवाने दिले आहेत. तथापि, चंद्रपूरमधील दारूबंदीचा निर्णय राजकीय बळ वाढविण्यासाठी करण्यात आला, असे या प्रकरणात म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने सांगितले. राज्य शासनाने दारूबंदीचा निर्णय झाल्यानंतर ५ मार्च रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यविक्रीचे सर्व परवाने रद्द करण्याचा व यापुढे कुणालाही नवीन परवाने न देण्याचा आदेश जारी केला. निर्णयाविरुद्ध मद्यविक्रेते व इतरांनी पाच वेगवेगळ्या रिट याचिका दाखल केल्या होत्या.
चंद्रपूरमध्ये दारूबंदी कायम!
By admin | Published: January 08, 2016 2:56 AM