मुंबई : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पाचवेळा आमदार, त्याआधी महापौर अशी दीर्घ राजकीय कारकिर्द लाभलेले देवेंद्र फडणवीस हे आता गीतकारही झाले आहेत. मध्यंतरी त्यांनी प्रभू श्रीरामाचा महिमा सांगणारे भजन रचले. आता भगवान शंकराचे गुणगान करणारे त्यांचे गीत श्रोत्यांच्या भेटीला आले आहे. अब जब विराजे राम लला तो राम राज ही लाएंगेराम ही मन मे राम ही तन मे रोम रोम मे राम हैराम ही स्वर है राम ही धुन है ध्वनि अब तो राम हैहे गीत फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी गायले आणि अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. सोशल मीडियात ते लोकप्रिय झाले आहे. एक बँकर असलेल्या अमृता या गायिकादेखील आहेत आणि त्यांच्या गाण्यांचे बरेच अल्बमही निघालेले आहेत.आता भगवान शंकरावर फडणवीस यांनी लिहिलेले गीत सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि अमृता फडणवीस यांनी गायले आहे. त्याच्या काही ओळी आहेत - देवाधि देव महादेवदेवाधि देव तू तो सांब सदाशिवतू तो कण कण मे जीव तू तो धरती की नीव तू तो देवाधि देव... महाशिवरात्रीनिमित्त हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऐकले गेले.
मित्रासाठी केले होते मॉडेलिंग फडणवीस नागपुरात आमदार असताना त्यांनी मित्राच्या कपड्यांच्या दुकानाच्या जाहिरातीसाठी मॉडेलिंग केले होते. त्याचे होर्डिंग शहरात काही ठिकाणी लावण्यात आले होते व तो तेव्हा चर्चेचा विषय झाला होता. त्यावेळी त्यांचे फोटोशूट नागपूरचे प्रसिद्ध छायाचित्रकार विवेक रानडे यांनी केले होते.
होय मी मराठी...मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवनात 'कुसुमाग्रजांचा साहित्य जागर' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्येकाने एक स्वरचित कविता सादर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यावेळी व्यासपीठावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कविता स्वतः शब्दबद्ध केली आणि ती आपल्या भाषणाच्या शेवटी सादर केली.शब्द खजिना जरी रिती झोळी मराठीला समर्पित माझ्या ओळी आपले नाते जशा रेशीम गाठी गर्वाने म्हणू या... होय मी मराठी, होय मी मराठी...