स्थानिक उमेदवारांची भाऊगर्दी - गौरीशंकर घाळेमुंबई : सर्व प्रकारच्या नागरी समस्यांनी वेढलेला वॉर्ड म्हणून एम-ईस्टची ओळख देता येईल. आशियातील श्रीमंत महापालिकेने आपल्या कारभाराचा कितीही दिंडोरा पिटला तरी सर्व प्रकारच्या नागरी समस्या एकाच ठिकाणी पाहायच्या असतील तर एम इस्टचा फेरफटका मारायला हरकत नाही. दोन दशकाहून अधिक काळ येथील राजकारण समाजवादी पक्षा(सपा)च्या अवतीभोवतीच फिरताना दिसते. मराठी आणि दलित वस्तीचा काही भाग सोडला तर संपूर्ण पट्टा दाट मुस्लिम लोकवस्तीचा. ओवेसी बंधुंनी मुंबईत जोर लावला असला तरी सपाने अद्याप तरी आपला गड चिरेबंदी ठेवण्यात यश मिळविले आहे. गेल्या पालिका निवडणुकीत या वॉर्डातील चार जागा सपाने जिंकल्या होत्या तर दोन जागांवर दुस-या क्रमांकाची मते मिळवली होती. स्थानिक उमेदवारांची भाऊगर्दी असताना बाहेरचा उमेदवार द्यायचा आणि त्याला जिंकून आणायचे हेच सपाचे आतापर्यंतचे राजकारण राहीले. सपा नेते आमदार अबू आझमी स्वत: या मतदारसंघासाठी बाहेरचे. यंदा मात्र स्थानिकांना उमेदवारी द्यावी ही मागणी वाढत आहे. आतापर्यंत एमआयएमला या पट्टयातील मुस्लिम वस्तीत आपले हातपाय पसरविता आले नाही. मात्र, डावलल्या गेलेल्या स्थानिकांना आपल्या झेंड्याखाली आणून एमआयएमचा ‘पतंग’ उडवायची गणिते मांडली जात आहेत.या वॉर्डात काँग्रेसचे दोन नगरसेवक आहेत. तर, दोन जागी त्यांचे उमेदवार दुस-या क्रमांकावर होते. मुस्लिम समाजातील जनाधार टिकविण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरु आहे. एमआयएमचा शिरकाव झालाच तर होणा-या मतविभाजनातून काँग्रेसी पंजा सहीसलामत राहील यासाठी स्थानिक पक्षसंघटनेवर बराचसा भर असणार आहे. देवनार म्यनिसिपल कॉलनी, देवनार गाव, मंडाळा गाव, महारष्ट्र नगर आणि चिता कँप व पायली पाडा या भागात मराठी वस्तीला शिवसेनेचा आधार आहे. पालिकेतील राजकारणात एकेकाळी महत्वाची भूमिका बजावणारे आणि आता खासदार म्हणून निवडून आलेल्या राहुल शेवाळेंसमोर शिवसेनेचा आकडा वाढविण्याची जबाबदारी आहे. पंधरा पैकी तब्बल अकरा जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे एखाद-दुसरा सन्मानजनक अपवाद वगळता उर्वरित सर्वच ठिकाणी अमक्या तमक्याची बायको वगैरे अशाच उमेदवारांची गर्दी इथे असणार आहे. त्यासाठी संबंधितांनी जोरदार मोर्चेबांधणीही सुरु केली आहे. -------------------------------------देवनार डम्पिंग ग्राऊंडचा विषय राजकीय आखाड्यात खुप काळ चघळला गेला. सरकार दरबारीही याबाबत विविध घोषणा झाल्या. प्रत्यक्षात मात्र डम्पिंगच्या समस्या जशीची तशी आहे. दुर्गंधी आणि प्रदुषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना केवळ कागदावरच राहील्या. केवळ राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी या प्रश्नी पुढा-यांनी तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा दुसरे काही केलेले नाही. -----------------------या वॉर्डातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. मानखुर्द मंडाळा, शिवाजी नगर, रफीक नगर, महाराष्ट्र नगर, ट्राँबे वगैरे भागातील पाण्याचा प्रश्न तसाच आहे. तर, सिद्धार्थ कॉलनी, गोल्फ क्लब आदी भागात गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त आहेत. पाणी पुरवठ्याबाबत पालिकेचे दावे या वॉर्डात अक्षरश: हास्यास्पद वाटतात. --------------------------शिवाजी नगर, बैंगनवाडी आणि चिता कँप या मोठ्या परिसरातील अनधिकृत आणि बेलगाम झोपड्यांमुळे नागरी व्यवस्था अक्षरश: कोलमडून गेली आहे. मानखुर्द, महाराष्ट्र नगर, शिवाजी नगर वगैरे भागातील खाडीपट्टयाचा भागात भराव टाकून बिनदिक्कतपणे पत्र्याचे शेड उभारले जातात. लाखोंच्या घरात या शेडची विक्री केली जाते. भराव आणि शेडच्या रुपाने या भागात घरमाफीयाच बोकाळला आहे. --------------------------------रस्ते आणि प्रदुषण या दुहेरी समस्येने या वॉर्डाला घेरले आहे. आरसीएफ, बीपीसीएल या रासायनिक कंपन्या, देवनारचा डम्पिंग ग्राऊंडच्या जोडीला ठिकठिकाणी रस्त्याची कामे, वाहतूक कोंडी आणि धूळीचे साम्राज्य असेच काहीसे चित्र ब-याच भागात आहे. जोडीला सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदुषण होत असते. मोनो-मेट्रो प्रकल्पाच्या निमित्ताने खोदलेल्या रस्त्यांमुळेही ठीकठीकाणी धूळ, धूर आणि ध्वनी प्रदुषणाची समस्या पाहायला मिळते. --------------------------रफीकनगर, इंदिरानगर, कमलानगर, आदर्शनगर, शिवाजीनगर बस डेपो, रमाबाई नगर, मोहिते-पाटील नगर, चिकूवाडी, एकतानगर, मंडाला, आदसा नगर फेज-२, शिवाजी नगर टर्मिनस, शिवाजीनगर, नूर-ए-ईलाही मस्जिद, रमणमामा नगर फेज-२, मेट्रो हॉस्पिटल, शिवाजी नगर हॉस्पिटल, म्युनिसिपल ऊर्दू स्कूल, नटवर पारेख कंपाऊंड. इंडीयन आॅईलनगर, एसीसी नगर, लोटस कॉलनी, म्हाडा कॉलनी, शिवाजीनगर जंक्शन, गौतमनगर, न्यू गौतमनगर, निमोनीनगर, टाटानगर, देवनार स्लॉटर हाऊस, म्युनिसिपल कॉलनी सेक्टर १, २ आणि एच-३ ब्लॉक, अण्णाभाऊ साठे नागर, झाकीर हुसैन नगर, लल्लुभाई कंपाऊंड, ज्योर्तिलिंग नगर, पीएमजी कॉलनी, लाले अमीरचंद कॉम्प्लेक्स, महाराष्ट्र नगर, चिता कँप सेक्टर सी, डी,एफ, चिता कँप, देवनार व्हिलेज, शिवनेरी नगर, टेलिकॉम फॅक्टरी कॉलनी, अमरनगर, एमबीपीएी कॉलनी, न्यू मंडाला, मानखुर्द गाव, बीएसएनएल टेलिकॉम फॅक्टरी, चिता कँप सेक्टर ए,जी,एह,आय, अप्पर ट्राँबे, ट्राँबे कोळीवाडा, धोबीघाट, दत्ता नगर, शहाजीनगर, पायलीपाडा, अणुशक्ती कॉलनी, वाडवली गाव, सह्याद्रीनगर, अणुशक्ती नगर, बीएआरसी, टाटा कॉलनी, आरसीएफ कॉलनी, बीपीसीएल कॉलनी, एमएमआरडीए कॉलनी, अयोध्यानगर, एचपी नगर, भारत नगर, विष्णू नगर, भारत पेट्रोलियम रिफायनरी, काळा चौकी. --------------------------१३४ खुला महिला१३५ खुला महिला १३६ खुला महिला१३७ इतर मागासवर्ग महिला१३८ खुला महिला१३९ खुला१४० इतर मागासवर्ग महिला१४१ खुला१४२ अनुसूचित जाती महिला१४३ इतर मागासवर्ग महिला१४४ खुला महिला १४५ खुला१४६ अनुसूचित जाती१४७ इतर मागासवर्ग महिला१४८ खुला महिला----------------------प्रभाग क्रमांक १३४ आरक्षण - खुला महिलाएकूण लोकसंख्या - ५१४६५अनुसूचित जाती - ४१२अनुसूचित जमाती - ५५प्रभागाची व्याप्ती- रफीकनगर, इंदिरानगर, कमलानगर, आदर्शनगर, शिवाजीनगर बस डेपोप्रभाग क्रमांक १३५ आरक्षण - खुला महिलाएकूण लोकसंख्या - ५७८७४अनुसूचित जाती - ४८८८अनुसूचित जमाती - १२११प्रभागाची व्याप्ती- रमाबाई नगर, मोहिते-पाटील नगर, चिकूवाडी, एकतानगर, मंडालाप्रभाग क्रमांक १३६ आरक्षण - खुला महिलाएकूण लोकसंख्या - ५६०५४अनुसूचित जाती - १८९०अनुसूचित जमाती - १४२प्रभागाची व्याप्ती- आदसा नगर फेज-२, शिवाजी नगर टर्मिनस.प्रभाग क्रमांक १३७ आरक्षण - इतर मागासवर्ग महिलाएकूण लोकसंख्या - ५१७३८अनुसूचित जाती - १९३९अनुसूचित जमाती - १५८प्रभागाची व्याप्ती- शिवाजीनगर, नूर-ए-ईलाही मस्जिद.प्रभाग क्रमांक १३८आरक्षण - खुला महिलाएकूण लोकसंख्या - ५२२६२अनुसूचित जाती - १३३६अनुसूचित जमाती - १३९प्रभागाची व्याप्ती- रमणमामा नगर फेज-२, मेट्रो हॉस्पिटल, शिवाजी नगर हॉस्पिटल, म्युनिसिपल ऊर्दू स्कूल. प्रभाग क्रमांक १३९ आरक्षण - खुला एकूण लोकसंख्या - ६००११अनुसूचित जाती - ६२६६अनुसूचित जमाती - ३२१प्रभागाची व्याप्ती- नटवर पारेख कंपाऊंड. इंडीयन आॅईलनगर, एसीसी नगर, लोटस कॉलनी, म्हाडा कॉलनी, शिवाजीनगर जंक्शनप्रभाग क्रमांक १४० आरक्षण - इतर मागासवर्ग महिला एकूण लोकसंख्या - ५७२६८अनुसूचित जाती - ८७००अनुसूचित जमाती - १०५३प्रभागाची व्याप्ती- गौतमनगर, न्यू गौतमनगर, निमोनीनगर, टाटानगर, देवनार स्लॉटर हाऊस.प्रभाग क्रमांक १४१ आरक्षण - खुलाएकूण लोकसंख्या - ५७४१७अनुसूचित जाती - ९५२२अनुसूचित जमाती - ३३२प्रभागाची व्याप्ती- म्युनिसिपल कॉलनी सेक्टर १, २ आणि एच-३ ब्लॉक, अण्णाभाऊ साठे नागर, झाकीर हुसैन नगर. प्रभाग क्रमांक १४२आरक्षण - अनुसूचित जाती महिलाएकूण लोकसंख्या - ५४५६३अनुसूचित जाती - ६२८६अनुसूचित जमाती - १०७१प्रभागाची व्याप्ती- लल्लुभाई कंपाऊंड, ज्योर्तिलिंग नगर, पीएमजी कॉलनी, लाले अमीरचंद कॉम्प्लेक्स.प्रभाग क्रमांक १४३ आरक्षण - इतर मागासवर्ग महिलाएकूण लोकसंख्या - ५१४१२अनुसूचित जाती - ३५४०अनुसूचित जमाती - ५३१प्रभागाची व्याप्ती- महाराष्ट्र नगर, चिता कँप सेक्टर सी, डी,एफ, चिता कँप.प्रभाग क्रमांक १४४आरक्षण - खुला महिलाएकूण लोकसंख्या - ५०३२६अनुसूचित जाती - ५४८४अनुसूचित जमाती - ९५७प्रभागाची व्याप्ती- देवनार व्हिलेज, शिवनेरी नगर, टेलिकॉम फॅक्टरी कॉलनी, अमरनगर, एमबीपीएी कॉलनी, न्यू मंडाला, मानखुर्द गाव, बीएसएनएल टेलिकॉम फॅक्टरी. प्रभाग क्रमांक १४५ आरक्षण - खुलाएकूण लोकसंख्या - ५३२१३अनुसूचित जाती - ११०९अनुसूचित जमाती - १०२६प्रभागाची व्याप्ती- चिता कँप सेक्टर ए,जी,एह,आय, अप्पर ट्राँबे, ट्राँबे कोळीवाडा, धोबीघाट, दत्ता नगर, शहाजीनगर, पायलीपाडाप्रभाग क्रमांक १४६आरक्षण - अनुसूचित जातीएकूण लोकसंख्या - ५४३९४अनुसूचित जाती - १११७५अनुसूचित जमाती - ९७०प्रभागाची व्याप्ती- अणुशक्ती कॉलनी, वाडवली गाव, सह्याद्रीनगर, अणुशक्ती नगर, बीएआरसी.प्रभाग क्रमांक १४७आरक्षण - इतर मागासवर्ग महिलाएकूण लोकसंख्या - ५४१६६अनुसूचित जाती - ९९१७अनुसूचित जमाती - ८११प्रभागाची व्याप्ती- टाटा कॉलनी, आरसीएफ कॉलनी, बीपीसीएल कॉलनी, एमएमआरडीए कॉलनी, अयोध्यानगर.प्रभाग क्रमांक १४८आरक्षण - खुला महिलाएकूण लोकसंख्या - ५२३८०अनुसूचित जाती - ६३२०अनुसूचित जमाती - ११८३प्रभागाची व्याप्ती- एचपी नगर, भारत नगर, विष्णू नगर, भारत पेट्रोलियम रिफायनरी, काळा चौकी. २०१२च्या निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवारवॉर्डविजयी उमेदवारमतेपराभूत उमेदवारमते१२९ रेश्मा नेवरेकर, सपा ४२४१फरिदा मोमीन, राष्ट्रवादी ३२९९१३० सिराज शेख, अपक्ष ३९२२हाजी शेख, सपा २६९७१३१ नूरजहाँ रफीक, सपा ५५१५महादेव आंबेकर, शिवसेना ४२१६१३२ रईस शेख, सपा ८०७३मुझावर पैगंबर, राष्ट्रवादी ३२४५१३३ शांताराम पाटील, सपा ५७२५मुनाफ दिवते, काँग्रेस ४५९०१३४ राहुल शेवाळे, शिवसेना ७५८४रवींद्र गवस, मनसे ३४४०१३५ हनीफबाई, अपक्ष १०९३५खैरुनुसा हुसैन, सपा २१२७१३६ मंजू कुमारे, शिवसेना ९३६३लता वळवी, राष्ट्रवादी ४९७७१३७ सुनंदा लोकरे, काँग्रेस ४६६०सायली नारकर, मनसे २२७५१३८ अरुण कांबळे, बीबीएम २८५१सतिश चव्हाण, आरपीआय २५२८१३९ दिनेश पांचाळ, शिवसेना ९९५६शशिकांत पाटील, काँग्रेस ८४०४१४० उषा कांबळे, काँग्रेस ४६१८पुष्पा भोसले, अपक्ष ४६१८१४१ विठ्ठल खरटमोल, भाजपा ७५८०राजू शिरसोडे, राष्ट्रवादी ६१८४