शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

तांत्रिक देखाव्यात ‘मदनलाल धिंग्रा’ अग्रेसर

By admin | Published: September 22, 2015 12:18 AM

डायनासोर, स्केलटोरे, बोफोर्स तोफ, अ‍ॅनाकोंडा आणि यंदा ‘निंजा हातोडी’

कोल्हापूर : गणेशोत्सव म्हटले की, देखावे हे ओघाने आलेच म्हणून समजा. मात्र, ते देखावे नावीन्यपूर्ण आणि बालचमंूच्या मनी ठसणारे असले की, त्या गणेशोत्सव मंडळाची छबी कायम राहते. अशाच छबी गेली वीस वर्षे कोल्हापूरकरांच्या मनावर कोरणाऱ्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डायनासोर, स्केलेटोर, बोफोर्स तोफ, अ‍ॅनाकोंडा, डोरेमॉन यासारख्या हुबेहूब प्रतिकृती तयार करून त्या देखाव्यात सादर करण्याची परंपरा मदनलाल धिंग्रा तरुण मंडळाने आजतागायत राखली आहे. १९९५ मध्ये ‘डायनासोर’ या चित्रपटाने संपूर्ण जगात खळबळ माजवून दिली होती. या चित्रपटातील हुबेहूब दिसणारा शाकाहारी डायनासोर (ट्रायसिरा ट्रॉप) मदनलाल धिंग्रा तरुण मंडळाने साकारला. महाकाय वाटणारा १५ फुटांचा प्राणी तोही हालचाल आणि चालता करण्याचे मोठे आव्हानात्मक काम होते. हे आव्हानात्मक काम नुकतेच विज्ञान शाखेतून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या मनू पोतदार व संतोष पोतदार या बंधूंनी स्वीकारले. त्यांनी रिमोट सेन्सरचा वापर करून पाच दिवस गणेशोत्सवात व विसर्जनादिवशी संपूर्ण मिरवणूक मार्गावर चालत फिरविला. या यशानंतर या मंडळाने गेल्या वीस वर्षांत कधी मागे फिरून पाहिले नाही. सातत्याने यात तांत्रिक देखाव्यांची भर पडत गेली तर पुढच्याच वर्षी अर्थात १९९६ मध्ये ‘स्केलेटोर’ हा देखावा सादर केला. त्यान्तर प्रतिवर्षी अ‍ॅनाकोडा, रोबोकॉप, बोफोर्स तोफ, वीरप्पन, लायन, जायंट स्पाईडर, फ्लॉर्इंग सोसर, जादू , हनुमान, टॉम अ‍ॅन्ड जेरी, अ‍ॅक्वॅरियम, जायंट बर्ड, जायंट एलिगेटर (अवतार फेम), क्युरॅसिटी रोव्हर,‘डोरोमान’, ’मोटू अ‍ॅन्ड पतलू’ या देखाव्यांच्या रूपातून प्रत्येकाला विचार करायला लावणारी प्रतिकृती सादर केली. केवळ मनोरंजन हा उद्देश या मंडळाने ठेवला नाही, तर यातून बालचमूने काहीतरी शिकावे हा होता. मुळात उद्यमनगर हे यंत्रनिर्मिती आणि यंत्रांची दुरुस्ती याकरिता संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. ज्या काळी स्कूटरची निर्मिती झाली नव्हती. त्याकाळी कोल्हापूरसारख्या अगदी लहान शहरातून म्हादबा मेस्त्री (शेळके) यांनी कोळशावर चालणारी स्कूटर व आचार्य अत्रे यांच्या विनंतीवरून फिरता रंगमंच त्याकाळात तयार केला होता. हीच परंपरा ही मंडळीही आजही जपत आहेत. या मंडळाची धुरा संजय गायकवाड, फारूख शेख, सतीश भोसले, उदय भोसले, राजू शिंदे, अनिल पिसाळ, सुनील पिसाळ, समीर शेख, प्रमोद पाटील, धनंजय गायकवाड, धोंडिराम कवठेकर, विनोद पाटील, भगवान निकम, ओमकार भोसले, सिद्धेश भोसले, अफरोज शेख, आदी सांभाळत आहेत. विज्ञान शाखेतून पदवी घेताना भौतिकशास्त्र हा विषय ठेवला होता. त्यातून इलेक्ट्रॉनिक्स विषयाची गोडी लागली. १९९२ मध्ये हाताची टाळी वाजविली की गाडी पुढे जाईल व टाळी वाजविली की गाडी थांबेल, असे मॅकॅझम असलेली गाडी बनविली होती. याबद्दल माझ्या मित्रांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी १९९५ मध्ये तू आपल्या मंडळासमोर ‘डायनोसार’ हा तांत्रिक देखावा तुम्ही दोघेजण करून द्या, अशी गळ घातली. त्यामुळे मी व माझा भाऊ संतोष व समीर, प्रमोद, सुनील, संदीप यांच्या साथीने ‘डायनोसार’सारखा महाकाय प्राणी रस्त्यावर फिरवून दाखविला. पुढे अ‍ॅनाकोंडा, बोफोर्स टँक, आदी देखावे सादर केले. - मनु पोतदार, तंत्रज्ञ, मदनलाल धिंग्रा तरुण मंडळ