लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीबीएसई बारावीच्या परीक्षेत उपराजधानीतील भवन्स बी.पी. विद्यामंदिर (सिव्हिल लाइन्स) शाळेची विद्यार्थिनी मधुरिमा साहा हिने अव्वल क्रमांक पटकाविला. मधुरिमा वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी असून तिला ९८ टक्के गुण मिळाले.‘सीबीएसई’ने गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही. मात्र विदर्भातील शाळांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या २० मध्ये मुलींची संख्या अधिक आहे. त्यातही विज्ञान, वाणिज्य शाखेत मुलींचाच वरचष्मा दिसून आला. नागपूर जिल्ह्यातून १,६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत बहुतांश विदर्भातील शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. विज्ञान शाखेत केंद्रीय विद्यालय, वायुसेनानगर येथील विद्यार्थी शिवम पोतदार याने ९७.६ टक्के गुणांसह अव्वल क्रमांक पटकाविला. तसेच मानव्यशास्त्र शाखेत याच शाळेची मीनाक्षी गोलछा ही ९६.४० टक्के गुणांसह प्रथम क्रमांकावर राहिली आहे.पुण्यात शंभर टक्के निकालशहरातील बहुतेक सीबीएसई शाळांचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शहरातील शाळांकडून प्राप्त निकालावरून वानवडी येथील आर्मी पब्लिक स्कूलमधील नंदिनी देसीराजू ही विद्यार्थिनी ९८.२ टक्के गुणांसह शहरात पहिली, तर दिल्ली पब्लिक स्कूलमधील अक्षत चुघ हा ९८ टक्के गुण मिळवून दुसरा आला आहे. अक्षत जेईई (मुख्य) परीक्षेत महाराष्ट्रात पहिला, तर देशात सातवा आला होता. औंध येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमधील विज्ञान शाखेतील रोहित सहस्रबुद्धे, तर वाणिज्य शाखेतील इशा धर्मानी यांनी ९७.४ टक्के गुण मिळवत शहरात तिसरा क्रमांक मिळविला.
मधुरिमा साहा विदर्भात ‘टॉप’
By admin | Published: May 29, 2017 4:33 AM