एसटी बस अपघात: सात जणांची ओळख पटली; मृतांपैकी चार जण महाराष्ट्रातील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 01:24 PM2022-07-18T13:24:02+5:302022-07-18T14:16:58+5:30
ST Bus Accident in Madhya Pradesh: १५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर डेपोची एसटी बस होती. सकाळी ही बस इंदूरहून निघाली, वाटेत खलघाटात ही बस नर्मदा नदीत कोसळली.
मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे मोठा अपघात झाला आहे. महाराष्ट्राची एसटी बस इंदौरहून अमळनेरकडे येत होती, यावेळी ती पुलावरून नर्मदा नदीपात्रात कोसळली. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ७ जणांची ओळख पटली असून चार जण महाराष्ट्रातील रहिवासी आहेत.
हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळ मदतीसाठी 09555899091
जळगाव जि. का. नियंत्रण कक्ष 02572223180, 02572217193
Narmada River ST Bus Accident: एसटी बस नदीच्या पाण्यात नाही, खांबाच्या चौथऱ्यावर कोसळली; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार...
१५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर डेपोची एसटी बस होती. सकाळी ही बस इंदूरहून निघाली, वाटेत खलघाटात ही बस नर्मदा नदीत कोसळली. एसटी बसमधून सुमारे ५० ते ५५ प्रवासी प्रवास करत होते. एसटी प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केला असून 022-23023940 असा हा क्रमांक आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत, मृतांची ओळख पटविण्याचे काम करण्यात येत असल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे.
Till now, 13 bodies have been recovered. Rescue operation underway. I've spoken with Maharashtra CM and Dy CM. We're making every possible arrangement. Directions given for probe. I've also directed Min Kamal Patel to reach the spot: MP CM Shivraj Singh Chouhan on Dhar accident pic.twitter.com/XRYhL7QJBz
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) July 18, 2022
मृतांची नावे....
1. चेतन राम गोपाल जांगिड़ रा. नांगल कला, गोविंदगढ़, जयपुर राजस्थान
2. जगन्नाथ हेमराज जोशी (७०) रा. मल्हारगढ़, उदयपुर राजस्थान
3. प्रकाश श्रवण चौधरी (४०) रा. शारदा कॉलनी, अमळनेर
4. नीबाजी आनंदा पाटील (६०) रा. पिलोदा अमळनेर
5. चंद्रकांत एकनाथ पाटील (४५) रा. अमळनेर
6. अरवा मुर्तजा बोरा (३७) रा. मूर्तिजापुर, अकोला.
7. सैफुद्दीन अब्बास रा. नूरानी नगर, इंदूर