मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे मोठा अपघात झाला आहे. महाराष्ट्राची एसटी बस इंदौरहून अमळनेरकडे येत होती, यावेळी ती पुलावरून नर्मदा नदीपात्रात कोसळली. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ७ जणांची ओळख पटली असून चार जण महाराष्ट्रातील रहिवासी आहेत.
हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळ मदतीसाठी 09555899091जळगाव जि. का. नियंत्रण कक्ष 02572223180, 02572217193
Narmada River ST Bus Accident: एसटी बस नदीच्या पाण्यात नाही, खांबाच्या चौथऱ्यावर कोसळली; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार... १५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर डेपोची एसटी बस होती. सकाळी ही बस इंदूरहून निघाली, वाटेत खलघाटात ही बस नर्मदा नदीत कोसळली. एसटी बसमधून सुमारे ५० ते ५५ प्रवासी प्रवास करत होते. एसटी प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केला असून 022-23023940 असा हा क्रमांक आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत, मृतांची ओळख पटविण्याचे काम करण्यात येत असल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे.
मृतांची नावे....1. चेतन राम गोपाल जांगिड़ रा. नांगल कला, गोविंदगढ़, जयपुर राजस्थान2. जगन्नाथ हेमराज जोशी (७०) रा. मल्हारगढ़, उदयपुर राजस्थान3. प्रकाश श्रवण चौधरी (४०) रा. शारदा कॉलनी, अमळनेर4. नीबाजी आनंदा पाटील (६०) रा. पिलोदा अमळनेर5. चंद्रकांत एकनाथ पाटील (४५) रा. अमळनेर6. अरवा मुर्तजा बोरा (३७) रा. मूर्तिजापुर, अकोला.7. सैफुद्दीन अब्बास रा. नूरानी नगर, इंदूर