Narmada River ST Bus Accident: एसटी बस अपघात: महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना १० लाख रुपये मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 01:58 PM2022-07-18T13:58:03+5:302022-07-18T14:07:25+5:30

ST Bus Accident in Madhya Pradesh: एसटी प्रशासन, जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.

Madhya Pradesh Narmada River ST Bus Accident: Government of Maharashtra announced Rs 10 lakh assistance to the next of kin of each deceased | Narmada River ST Bus Accident: एसटी बस अपघात: महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना १० लाख रुपये मदत जाहीर

Narmada River ST Bus Accident: एसटी बस अपघात: महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना १० लाख रुपये मदत जाहीर

Next

मध्ये प्रदेशमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

Narmada River ST Bus Accident: एसटी बस नदीच्या पाण्यात नाही, खांबाच्या चौथऱ्यावर कोसळली; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार...

Narmada River ST Bus Accident: एसटी बस अपघात: सात जणांची ओळख पटली; मृतांपैकी चार जण महाराष्ट्रातील

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. यानंतर त्यांनी अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश एसटी महामंडळाला दिले आहेत. 

१३ मृतांपैकी ७ जणांची ओळख पटली आहे. यापैकी चार जण हे महाराष्ट्रातील अकोला आणि अमळनेरचे आहेत. अद्याप काही प्रवासी बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच १५ जण वाचले आहेत. यापैकी ५-७ जण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. एसटी प्रशासन, जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळ मदतीसाठी 09555899091 तर जळगाव जि. का. नियंत्रण कक्ष 02572223180, 02572217193 असे हे क्रमांक आहेत. 

मृतांची नावे....
1. चेतन राम गोपाल जांगिड़ रा. नांगल कला, गोविंदगढ़, जयपुर राजस्थान
2. जगन्नाथ हेमराज जोशी (७०) रा. मल्हारगढ़, उदयपुर राजस्थान
3. प्रकाश श्रवण चौधरी (४०) रा. शारदा कॉलनी, अमळनेर
4. निंबाजी आनंदा पाटील (६०) रा. पिलोदा अमळनेर
5. चंद्रकांत एकनाथ पाटील (४५) रा. अमळनेर
6. अरवा मुर्तजा बोरा (३७) रा. मूर्तिजापुर, अकोला.
7. सैफुद्दीन अब्बास रा. नूरानी नगर, इंदूर

Read in English

Web Title: Madhya Pradesh Narmada River ST Bus Accident: Government of Maharashtra announced Rs 10 lakh assistance to the next of kin of each deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.