जळगाव जामोद : मध्यप्रदेशातील एका इसमाजवळून पोलिसांनी देशी बनावटीचे १0 पिस्तुल गुरूवारी जप्त केले. विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर जळगाव पोलिसांनी केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशातील उमरटी येथील प्रकाश रहेमान खरते (बारेला) याच्याजवळ घातक शस्त्र असल्याची गोपनीय माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली हो ती. त्यानुसार पोलिसांनी बसस्थानक परिसरात पाळत ठेवली. त्याचवेळी बस स्थानक परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ विशिष्ट निशाणी घे तलेला इसम पोलिसांनी हेरला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याने शर्टच्या आतमध्ये लपवून ठेवलेले देशी बनावटीचे १0 पिस्तुल सापडले. घातक शस्त्रांची माहिती पोलिस उपनिरीक्षक मुपडे यांना मिळाल्याने त्यांनी ठाणेदार एम.एस. भोगे यांना सूचना दिली होती. या कारवाईत पोउनि मुपडे, अनिल इंगळे, विश्वनाथ जाधव, एएसआय धामोळे, पोकाँ गवळी, भारसाकडे यांनी भाग घेतला.आरोपी प्रकाश रहेमान खरते (बारेला) याच्याविरूद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ७/२५ व ८/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव जामोद तालुक्याला मध्यप्रदेशाची सीमा लागून आहे. यापूर्वी देशी कट्टे व लाखो रुपयांचा अवैध गुटखा या भागातून पोलिसांनी जप्त केला आहे, हे विशेष.
मध्यप्रदेशातील आरोपीकडून देशी बनावटीचे १0 पिस्तुल जप्त
By admin | Published: September 05, 2014 12:33 AM