अतुल कुलकर्णी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात स्वत:च्या ब्रॅण्डचे दूध विकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मसल पॉवरचा वापर होत असून या धंद्यात माफियागिरी सुरू आहे, असा गंभीर आरोप किसान सेनेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे. यामुळेच शहरी लोकांना दूध महाग दराने विकत घ्यावे लागत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकमत ऑनलाईनच्या नव्याने सुरु झालेल्या ‘ग्राऊंड झिरो’ या कार्यक्रमात मुलाखत देताना ते बोलत होते. महाराष्ट्रात दुधाचे २७२ ब्रॅण्ड आहेत. मात्र त्याच्या दर्जाविषयी अनेक प्रश्न आहेत. हे दूध कुठे आणि कोणी तपासायचे? याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. आपल्याकडे दूध तपासणी यंत्रणा उभी करण्याची जबाबदारी पालिका, महापालिका, जिल्हाधिकारी यांची आहे. पण ते हे काम करत नाहीत. त्यामुळे गोरगरिबांना निकृष्ट दर्जाचे दूध मिळते. पण राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग याबद्दल काहीच करायला तयार नाही, असा आक्षेपही डॉ. नवले यांनी घेतला.
दूध रस्त्यावर का सांडतो?आपल्याकडे मात्र महानंद हे सहकारी फेडरेशन सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून संपवण्याचा घाट घातला. आम्ही दुधाचे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले तर कोणी ऐकत नाही आणि तेच थोडेफार दूध आम्ही रस्त्यावर सांडले तर लगेच गदारोळ होतो, आम्ही काही खुशीने दूध सांडत नाही, आमचे काळीज तुटते, असेही ते म्हणाले.