औरंगाबाद : संपूर्ण देशात नि:शुल्क चिकित्सेच्या महाकुंभाच्या रूपात आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह साजरा केला जाणार आहे. देशातील सर्व प्रमुख संस्थांच्या नेतृत्वाखाली अॅक्युप्रेशर, सुजोक, शिआत्सू, रिफ्लेक्सोलॉजी, जैन रिफ्लेक्सोलॉजी आदी चिकित्सा पद्धतींच्या चिकित्सकांच्या सहकार्याने हे अभियान संपूर्ण देशात १८ ते २४ सप्टेंबरदरम्यान चालणार आहे. याअंतर्गत सर्व चिकित्सक प्रत्येक दिवशी दोन तास आपल्या केंद्रांमध्ये नि:शुल्क चिकित्सा करतील.दोन वर्षांपूर्वी या महाअभियानास लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ झाला. या नि:शुल्क सेवा सप्ताहाचे उद्घाटन १८ सप्टेंबर रोजी राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते आणि खा. चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत होईल. संयोजक जेआर अनिल जैन यांनी सांगितले की, भारतीय जीवन पद्धतीचे विकसित रूप रिफ्लेक्सोलॉजी अॅक्युप्रेशरसंदर्भात स्थानिकस्तरापासून विश्वस्तरापर्यंत जागरूकता झाली आहे.या सात दिवसांत स्थानिक पातळीवर अॅक्युप्रेशर चिकित्सक शिक्षण संस्था व्यावसायिक संस्थांत नि:शुल्क कार्यशाळेचे आयोजन करतील.अॅक्युप्रेशर ट्रेनिंग अॅण्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून इंटरनॅशनल नॅचरोपॅथी आॅर्गनायझेशन, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ होलिस्टिक सायन्स, भारतीय अॅक्युप्रेशर योग परिषद, बिहार अॅक्युप्रेशर योग कॉलेज, आॅल इंडिया असोसिएशन आॅफ अॅक्युप्रेशर रिफ्लेक्सोलॉजी, सायंटिफिक इन्स्टिट्यूट आॅफ अल्टरनेटिव मेडिसिन अॅण्ड पॅरामेडिकल सायन्स कौन्सिल, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अॅक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग अॅण्ड ट्रिटमेंट, विश्व चैतन्य अॅक्युप्रेशर थेरपी फाऊंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर, नेचर केअर थेरपिस्ट असोसिएशन आदी संस्थांच्या सहकार्याने प्रत्येक दिवशी दोन तास नि:शुल्क चिकित्सेचे आयोजन करण्यात येणार आहे.या सर्व कार्यक्रमांसाठी राष्ट्रीय स्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये प्रमुख म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ होलिस्टिक सायन्सचे अध्यक्ष डॉ. पी. बी. लोहिया, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष अनंत बिरादर, भारतीय अॅक्युप्रेशर योग परिषदेचे अध्यक्ष डॉ. सर्वदेव प्रसाद गुप्ता, आॅल इंडिया असोसिएशन आॅफ अॅक्युप्रेशर रिफ्लेक्सोलॉजीच्या अध्यक्षा डॉ. कुसुम अग्रवाल व सहसंयोजक डॉ. दिलीप कुमार उरनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तिसरी अखिल भारतीय सभा मुंबईतअॅक्युप्रेशर, रिफ्लेक्सोलॉजी, सुजोक, शिआत्सू, जैन रिफ्लेक्सोलॉजी चिकित्सा पद्धतींच्या चिकित्सकांची तिसरी अखिल भारतीय सभा २४ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. याप्रसंगी देशातील प्रमुख चिकित्सक आपल्या अनुसंधानात्मक कार्यांचे सादरीकरण करतील. याप्रसंगी तीन वर्षांपेक्षा अधिक चिकित्सा देणाºया चिकित्सकांचा सत्कार करण्यात येणार आहे.काय आहे रिफ्लेक्सोलॉजी अॅक्युप्रेशर चिकित्सा पद्धतरिफ्लेक्सोलॉजी अॅक्युप्रेशर याचा अर्थ आहे, अॅक्यू अर्थात तिखट. प्रेशर अर्थात दबाव आणि रिफ्लेक्स म्हणजे प्रतिबिंब. शरीरातील अवयवांचे प्रतिबिंब केंद्र जे की, हात-पाय, कान व चेहºयावर आहे. त्यांना विशेष प्रकारचा दबाव देऊन उपचार करण्याच्या उपचार पद्धतीस रिफ्लेक्सोलॉजी अॅक्युप्रेशर म्हणतात.
संपूर्ण देशात चालणार चिकित्सेचा महाकुंभ, आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह १८ सप्टेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 4:29 AM