शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

महाबळेश्वरमध्ये मातीशिवाय उगवतेय स्ट्रॉबेरी!

By admin | Published: January 10, 2016 2:34 AM

महाबळेश्वरच्या तांबड्या मातीत पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीचे आता जमिनीत लागवड न करताही उत्पादन घेणे शक्य झाले आहे. ‘हायड्रोफोनिक’ तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी स्ट्रॉबेरीचे

- सचिन काकडे,  सातारामहाबळेश्वरच्या तांबड्या मातीत पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीचे आता जमिनीत लागवड न करताही उत्पादन घेणे शक्य झाले आहे. ‘हायड्रोफोनिक’ तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी स्ट्रॉबेरीचे दुपटीने उत्पादन घेत आहेत. राज्यात सर्वप्रथम हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग भिलार येथे करण्यात आला.हायड्रोफोनिक म्हणजे, स्ट्रॉबेरी रोपांची लागवड जमिनीत न करता कुंड्या अथवा ट्रफमध्ये केली जाते. त्यात मातीऐवजी नारळाची भुकटी टाकली जाते. रोपांना आवश्यक असणारी मुलद्रव्ये ज्यामध्ये एनपीके (प्रायमरी), कॅल्शिअम, मॅग्नेशिअम सल्फर (सेंकडरी) तसेच लोह, बोरॉन, थ्रिंक, कॉपर, अमोनिअम, मॉली या सुक्ष्म अन्नद्रव्यांची पाण्याच्या माध्यमातून पूर्तता केली जाते. या तंत्रज्ञानामुळे पाण्याची ९० टक्के बचत होते. या तंत्रज्ञानाच्या स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी गुंठा ४० हजार रुपये इतका खर्च येतो. हायड्रोफोनिक स्ट्रॉबेरीचा रंग, चव व सर्व गुणधर्म हे जमिनीतील स्ट्रॉबेरीप्रमाणेच असतात. यामुळे उत्पादनात दुपटीने वाढ होत असून, शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढत आहे. भिलार येथील किसन भिलारे यांनी राज्यात सर्वप्रथम याचा अवलंब करून स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले. प्रारंभी दोन गुंठे क्षेत्रात केलेला हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर तालुक्यातील २० शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान अवलंबविले. अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलाचा स्ट्रॉबेरीवर परिणाम होतो. गेल्या दोन वर्षांपासून ही परिस्थिती आहे. त्यामुळे उत्पादनातही काही प्रमाणात घट झाली आहे. - किसन भिलारे, प्रगतशील शेतकरी