शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

महाबँकेच्या अधिकाऱ्यांनी डीएसकेंना अशी केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 4:38 AM

बँक आॅफ महाराष्ट्राचे (महाबँक) अध्यक्ष व उच्चपदस्थ अधिकारी डी. एस. कुलकर्णींना कसे मदत करत होते, त्याचा पुरावाच ‘लोकमत’च्या हाती आला आहे.

- सोपान पांढरीपांडे/विशाल शिर्के नागपूर/ पुणे : बँक आॅफ महाराष्ट्राचे (महाबँक) अध्यक्ष व उच्चपदस्थ अधिकारी डी. एस. कुलकर्णींना कसे मदत करत होते, त्याचा पुरावाच ‘लोकमत’च्या हाती आला आहे. बँक आॅफ महाराष्ट्राने तीन दिवसांपूर्वी म्हणजे १८ जून २०१८ ला डीएसकेंच्या धायरी येथील एका मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी जी नोटीस वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केली त्यावरून बँकेचे उच्चाधिकारी व डीएसके यांचे कसे ‘साटेलोटे’ होते हे सिद्ध होते.लोकमतने केलेल्या चौकशीत महाबँकेने २०१६ मध्ये डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेडला जे कर्ज मंजूर केले त्यासाठी तारण म्हणून ठेवलेली मालमत्ता त्यापेक्षा ७५ टक्के कमी किमतीची होती, अशी माहिती महाबँकेतील सूत्रांनी दिली आहे. आज डीएसकेकडील थकीत कर्ज ३१.६५ कोटी अधिक व्याज एवढे फुगले आहे, तर मालमत्तेची राखीव किंमत महाबँकेने फक्त ८.६३ कोटी ठेवली आहे. २३ जुलै २०१८ ला होऊ घातलेल्या या लिलावात चारपट किंमत देऊन ही मालमत्ता कोण विकत घेईल, असा प्रश्न या प्रकरणाची माहिती असलेल्या बँक अधिकाºयांना सतावतो आहे.या प्रकरणात अपुºया तारणावर कर्ज मंजूर करणे एवढेच घडले नाही तर यात कर्जदार व जामीनदार एकच असल्याचेही स्पष्ट दिसते आहे. कर्जदार डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स आहेत, तर पाच जामीनदारांमध्ये स्वत: डीएसके, त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी व डीएसकेंच्या तीन कंपन्या असेंट प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स, रिच अ‍ॅग्रा फॉरेस्ट्री प्रा. लि. व होली लँड अ‍ॅग्रा फॉरेस्ट्री यांचा समावेश आहे. मजेची बाब म्हणजे, या सर्वांचा पत्ता डीएसके हाऊस शिवाजीनगर, पुणे हा एकच आहे. या प्रकरणात बँकेची बाजू जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले असता कुणीही उच्चपदस्थ अधिकारी या विषयावर बोलण्यास तयार झाला नाही. डीएसकेंकडे सर्व बँकांचे मिळून २९००कोटी कर्ज थकीत आहे. त्यापैकी बँक आॅफ महाराष्टÑची थकबाकी ९८ कोटी आहे. बँकेने डीएसकेंची मालमत्ता विकली तर बँकेचे कर्ज काही प्रमाणात वसूल होईल पण त्यामुळे डीएसकेंच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे कसे परत मिळतील हा प्रश्नच बँकिंग क्षेत्रात विचारला जातो.>डीएसके, बँक अधिकाºयांना ‘एमपीडीआय’अन्वये अटककुठल्याही बँकेच्या अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालकाला अटक करायची असेल तर वित्त मंत्रालय व मुख्य सतर्कता आयुक्ताची परवानगी सीबीआय कायद्याप्रमाणे घ्यावी लागते. पण डीएसकेंच्या प्रकरणात महाराष्टÑ प्रोटेक्शन आॅफ डिपॉझिटर्स इंटरेस्ट अ‍ॅक्ट (एमपीडीआय) कायद्याअंतर्गत होते आहे. महाराष्टÑ पोलीस खाते हे मुंबई पोलीस अ‍ॅक्टप्रमाणे काम करत असल्याने पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेला रवींद्र मराठे व राजेंद्र गुप्ता यांना अटक करण्यासाठी वित्त मंत्रालय/ मुख्य सतर्कता आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक नाही, म्हणून हे उच्चाधिकारी अटकेत आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.