शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

‘राम मंदिर’ स्थानकावरून सेना-भाजपात ‘महाभारत’

By admin | Published: December 23, 2016 5:39 AM

पश्चिम रेल्वेमार्गावर उभारण्यात आलेल्या ‘राम मंदिर’ रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच महाभारत

मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावर उभारण्यात आलेल्या ‘राम मंदिर’ रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच महाभारत घडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामापेक्षा मोठे नाहीत, असे विधान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केल्याने भाजपा कार्यकर्ते संतप्त झाले. तर शिवसैनिकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना आपले भाषण आवरते घ्यावे लागले.पश्चिम रेल्वेमार्गावरील जोगेश्वरी ते गोरेगावदरम्यान बांधण्यात आलेल्या ‘राम मंदिर’ स्टेशन उद्घाटनाचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. कार्यक्रमाला शिवसेना, भाजपासह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. झेंडे, होर्डिंग्ज, बॅनर यामुळे रेल्वे स्थानक आणि परिसरातील वातावरण राजकीय होऊन गेले. काही कार्यकर्ते तर मान्यवरांसाठी असलेल्या मंचासमोर ठाण मांडून होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ‘जय श्रीराम’सह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावांनी झालेल्या घोषणाबाजीने सभास्थान दणाणून गेले. सुरुवातीला शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर आणि राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची भाषणे झाली. त्या वेळीही भाजपाकडून ‘जय मोदीं’ची घोषणा देण्यात आली. तर राज्यमंत्री विद्या ठाकूर या भाषणाला येताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. तर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या भाषणात भाजपा कार्यकर्त्यांनी अडथळे आणत ‘जय मोदी’च्या घोषणा दिल्या.बराच वेळ घोषणाबाजी सुरुच असल्याने रावते यांचा संताप अनावर झाला. मंचासमोर येत त्यांनी ‘मोदी हे रामापेक्षा मोठे नाहीत’, असे विधान केले. शिवाय, गोंधळ घालणारे लंकेतून आले असावेत, अशी टिप्पणी केल्यामुळे गोंधळ अधिकच वाढला. या गोंधळातच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना अवघ्या दोन मिनिटांत आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. त्यानंतर रेल्वेमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींनी काढता पाय घेतला. (प्रतिनिधी)