शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

महाडिक कुटुंबाचे पवारांकडून सांत्वन

By admin | Published: November 25, 2015 3:45 AM

शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांना ‘विद्या प्रतिष्ठान’मध्ये नोकरी देण्याची, तसेच त्यांच्या दोन्ही मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करण्याची

सातारा : शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांना ‘विद्या प्रतिष्ठान’मध्ये नोकरी देण्याची, तसेच त्यांच्या दोन्ही मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करण्याची ग्वाही, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी दिली. महाडिक यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांनी कौटुंबिक परिस्थितीची माहिती घेतली.सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथे महाडिक यांच्या मूळगावी पवार यांनी मंगळवारी भेट दिली. महाडिक यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर त्यांनी महाडिक कुटुंबीयांशी सुमारे वीस मिनिटे चर्चा केली. स्वाती महाडिक या उच्चविद्याविभूषित आहेत. एम. एस. डब्ल्यू., बी. एड. असलेल्या स्वाती महाडिक या उधमपूर (काश्मीर) येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत होत्या. सरकारकडून नोकरीसाठी आता कोणते ठिकाण देण्यात येते हे पाहा. ते ठिकाण दूरचे असल्यास बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांना नोकरी देण्यात येईल. संस्थेतर्फे ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाच्या तीन शाळा चालविल्या जातात. तेथे स्वाती महाडिक यांना काम करता येईल. तसेच कार्तिकी आणि स्वराज या महाडिक यांच्या दोन्ही मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च केला जाईल, असे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)इस्लामपूर (सांगली) : दीड वर्षांत ऊसदराच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले गेलेले नाही. सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे. केंद्र सरकारकडून त्यासाठी अनुकूल धोरण आखले जात नाही. मात्र शेतकऱ्यांच्या जीवनातील हे दिवस बदलण्याची धमक लोकशाहीत आहे, असे सूचक वक्तव्य करीत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे मोदींना सत्तेवरून पायउतार व्हायला लावण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेतकऱ्यांना केले.कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रावरील माजी आमदार दिवंगत व्यंकाप्पा पत्की यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण पवार यांच्याहस्ते झाले. पवार म्हणाले की, साखरेचा दर तीन हजार ते एकतीसशे रुपयांपर्यंत जाणे आवश्यक होते. मात्र आज हीच साखर तेवीसशे ते चोवीसशे दराने विकली जात आहे. त्यामुळे मागणी करण्यात येणारा ऊस दर आणि साखरेच्या दरात मोठी तफावत आहे. याचा वास्तववादी विचार व्हायला हवा. कारखानदारी बंद पाडून ठेवण्यापेक्षा साखरेसह वीज आणि इथेनॉल निर्मितीमधून चार पैसे जादा मिळवून शेतकऱ्याला त्याच्या घामाचा दर देण्याची भूमिका घ्यायला हवी. देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. त्यामुळे यापुढील काळात मर्यादित जमीन, मर्यादित पाणी आणि अधिक साखरेचे प्रमाण असणारे पीक घेतले पाहिजे. (प्रतिनिधी)