दासगाव : पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याला काही दिवसच उलटले असून अचानक रायगड जिल्ह्यातील उरण शहरात चार संशयित अतिरेकी आल्याची माहिती मिळताच संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे. याच पार्श्वभूमीवर महाड शहर पोलीस ठाणे व गोरेगाव पोलीस ठाण्याने आपल्या हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ केलीआहे. वाहनांची तसेच येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. रविवारी उरी येथे झालेल्या हल्ल्यात १८ भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर अचानक मुंबईला लागूनच असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण येथे चार सशस्त्र संशयित अतिरेकी नौदलाच्या तळाकडे जाताना शाळकरी मुलांनी पाहिल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण रायगड जिल्हा तसेच मुंबईत खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा तसेच मुंबई येथे सर्व सुरक्षा यंत्रणा जागी होऊन ठिकठिकाणी सुरक्षा यंत्रणा सज्ज केली आहे. या पार्श्वभूमीवर महाड शहर पोलीस ठाणे हद्दीतील दासगाव बंदर, शिरगाव चेक पोस्ट या दोन ठिकाणी दोन अधिकारी व आठ कर्मचारी नेमले आहेत. या ठिकाणची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रवींद्र शिंदे हे स्वत: काही कर्मचाऱ्यांसह गस्त घालत आहेत. याचबरोबर गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील खाडीलगत असलेल्या आंबेत चेकपोस्ट या ठिकाणी नेहमी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करत पोलीस उपनिरीक्षक लोंढे हे कर्मचाऱ्यांसमवेत आंबेत, पळसप, राजबंदर अशा खाडीकिनारी असलेल्या ठिकाणी गस्त घालत आहेत.महाड तालुका पोलीस ठाण्याने मात्र याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. १९९३ च्या मुंबई हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेले आरडीएक्स महाडजवळील टोल मार्गेच महामार्गावर आणून मुंबईत गेले होते. शुक्रवारी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज होत असली तरी तालुका पोलीस ठाण्याने या मार्गावर कोणतीच खबरदारी घेतलेली नाही. याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. मा. शा. पाटील यांच्याकडे संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही. आंबेत ते टोल फाटा हा मार्ग पोलीस जिल्हा नियंत्रण कक्ष सांभाळत आहे. त्यांच्यामार्फत गस्त सुरू आहे असे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी नलावडे यांनी लोकमशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)> टोल मार्गावर सुरक्षा नाही१९९३ च्या मुंबई हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेले आरडीएक्स महाडजवळील टोल मार्गेच महामार्गावर आणून मुंबईत गेले होते. शुक्रवारी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज होत असली तरी तालुका पोलीस ठाण्याने या मार्गावर कोणतीच खबरदारी घेतलेली नाही. या ठिकाणी एकही पोलीस सुरक्षेसाठी तैनात न के ल्याने तसेच कोणत्याही प्रकारची गस्त या मार्गावर दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महाडमधील खाडी किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ
By admin | Published: September 24, 2016 2:43 AM