शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
4
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
5
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
6
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
7
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
8
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
9
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
10
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
11
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
12
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
13
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
14
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
15
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
16
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
17
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
18
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
19
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

शंकर -६ समोर महाकॉट ठरला सरस

By admin | Published: November 17, 2016 6:05 PM

खान्देशचा कापूस गुजरातेत नेऊन तेथे रूई बनवून शंकर-६ या ब्रॅण्डने त्या रूईची विक्री करून गुजराती जिनर्स खंडीमागे (३०० किलो रुई) दोन हजार रुपये जादा भाव मिळवायचे.

चंद्रकांत जाधव

जळगाव, दि. 17 - खान्देशचा कापूस गुजरातेत नेऊन तेथे रूई बनवून शंकर-६ या ब्रॅण्डने त्या रूईची विक्री करून गुजराती जिनर्स खंडीमागे (३०० किलो रुई) दोन हजार रुपये जादा भाव मिळवायचे. जळगावच्या जिनर्सनी यावर उपाय म्हणून कापसावर खान्देशातच प्रक्रिया करून त्यापासून जागतिक दर्जाची रूई तयार करून महाकॉट बॅण्ड विकसित केला. त्याला जगभर पोहोचविण्यासाठी सतत पाच वर्षे काम केले. त्याचे फलित की काय आता महाकॉट ब्रॅण्डच्या रूईला गुजरातच्या शंकर ६ च्या तुलनेत एक हजार रुपये जादा भाव मिळू लागला आहे.

खान्देशात जळगावात साडेचार लाख, धुळ््यात दीड लाख तर नंदुरबारात एक लाख हेक्टरवर दरवर्षी कापसाची लागवड होते. विदर्भानंतर खान्देश कापूस उत्पादनात पुढे आहे. खान्देशातील कापूस उद्योगाला जवळपास ११५ वर्षांचा इतिहास असून, १०० वर्षांपूर्वी जळगावात कापसापासून रूई तयार करण्यासंबंधी जिनींग उभ्या झाल्या. कापूस मुबलक प्रमाणात मिळत असल्याने जिनींगची संख्याही वाढली.

गुजरातचा शिरकाव व आव्हानजशा खान्देशात जिनींग वाढल्या तशा गुजरातेतही वाढल्या. पण गुजरात राज्यात फक्त २२ लाख हेक्टरपर्यंत कापसाची लागवड होते. तेथे जिनींग अधिक, पण रूईसाठी कापूस अपूर्ण, अशी स्थिती होती. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातून गुजरातमधील जिनर्स एजंटच्या माध्यमातून चार ते पाच लाख गाठींचा (१७० किलो रुई) कापूस दरवर्षी नेऊ लागले. गुजरातच्या वेगवेगळ््या भागात खान्देशी कापूस जाऊ लागला. गुजरातेत देशी कपाशीची अधिक लागवड होते. त्यात लांबी, ताकदीसंबंधी उत्तम असलेल्या खान्देशी कापूस मिसळून गुजरातेत शंकर ६ या ब्रॅण्ड अंतर्गत रुईची निर्मिती सुरू झाली व त्याला जागतिक पातळीवरून मागणीही वाढली.

महाकॉटचा जन्मरूईच्या निर्मितीत गुजरात हा महाराष्ट्रापुढेही गेला. राज्यात ८६ लाख तर गुजरातेत ९६ लाख गाठींवर निर्मिती सुरू झाली. साहजिकच तेथे जागतिक व देशांतर्गत मोठ्या बाजारातील रूई खरेदीदार पोहोचले. दुसऱ्या बाजूला जळगावचा किंवा खान्देशचा कापूस किंवा रुई मात्र कमी भावात विकली जाऊ लागली. शंकर- ६ च्या तुलनेत जळगावच्या गाठींना दोन हजार रुपये कमी भाव, अशी स्थिती २०१० पर्यंत कायम होती.

व्यापारी, उद्योजक, जिनर्स एकत्रगुजरातच्या शंकर ६ चे संकट लक्षात घेता खान्देश, मलकापूर, औरंगाबादचे जिनर्स २०११ मध्ये एकत्र आले. माजी मंत्री सुरेशदादा जैन, खान्देश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन, औरंगाबादचे भूपेंद्रसिंग राजपाल, मलकापूरचे त्रिलोद दंड, अरविंद जैन यांच्या उपस्थितीत व.वा.वाचनालयाच्या सभागृहात नोव्हेंबर २०११ मध्ये बैठक झाली. त्यात खान्देशतील प्रमुख रूई उत्पादक भागांनीही एकत्र येऊन महाकॉट अंतर्गत रूईचे बॅ्रडींग करण्यावर एकमत झाले.

राज्यभर लॉचींगमहाकॉटची २०१३ मध्ये एक आंतरराष्टीय बैठक जैन हिल्सवर घेऊन लॉचींग करण्यात आली. यानिमित्ताने महाकॉट देशांतर्गत बाजारासह जगात अनेक व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यात आला.

दरवर्षी उत्पादन वाढमहाकॉटची दरवर्षी उत्पादन वाढ होत आहे. २०१३ मध्ये १२ लाख गाठी, २०१४ मध्ये १३ लाख, २०१५ मध्ये १८ लाख तर यंदा २० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज आहे.

महाकॉटला जादा भावसध्या जागतिक बाजारात खंडीला ३९५०० रुपये भाव आहे. महाकॉटला मात्र ४० हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. चीनसह पाकिस्तान, व्हीएतनाम, बांगलादेश, कजाकिस्तान, दाक्षिणात्य कापड मिल, एम.एस.मिश्रा, गील अ‍ॅण्ड गील, नहार, वर्धमान अशा अनेक संस्था, देशांकडून महाकॉटला मागणी आहे. - गुजरातमध्ये आपला कापूस नेऊन तेथे त्याची रूई बनवून शंकर ६ या बॅ्रण्डने विक्री केली जायची व ते चांगला भावही मिळवायचे. यात तोटा आपल्या कापूस उत्पादकांचा होता. ही बाब लक्षात घेत आम्ही बुलडाणा, औरंगाबाद, जळगाव, धुळ््याचे जिनर्स एकवटलो व महाकॉटची निर्मिती सुरू केली. त्याचे फलित म्हणजे आपल्या खंडीला (३०० किलो रुई) एक हजार रुपये जादा भाव मिळतो. -प्रदीप जैन, अध्यक्ष, खान्देश जीन प्रेस असोसिएशन- महाकॉट आता खान्देश, बुलडाणा, मलकापूरपुरता मर्यादीत नाही. आपण सर्वांनी मिळून आता महाराष्ट्र कॉटन असोसिएशन स्थापन केली आहे. मराठवाड्यातही महाकॉट पाय रोवत असून, कापूस उत्पादकांच्या पदरात दोन पैसे अधिक कसे मिळतील यासाठी काम सुरू आहे. -अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन आॅफ इंडिया