ठाणे : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशाने दर वर्षी घेण्यात येणारी महालोकअदालत यंदा ६ डिसेंबर ऐवजी १३ डिसेंबरला भरवण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील प्रलंबित खटले मोठ्या संख्येने निकाली काढण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी महालोक अदालत घेणे योग्य नाही. त्यामुळे या वर्षी महालोक अदालत सुमारे एक आठवडा उशिर होणार आहे. या वाढीव मुदतीचा लाभ जास्तीत जास्त पक्षकारांना करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले हजारो खटले निकाली काढण्यासाठी ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. दोन्ही पक्षकारांच्या संमतीने प्रलंबित खटले निकाली काढले जाणार आहे. यासाठी ठाणे, कल्याण, वसई, पालघर, भिवंडी, उहाणू, जव्हार, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर, वाडा आणि वाशी-सीबीडी या न्यायालयांसह धर्मदाय आयुक्त, सहाकार न्यायालय, ग्राहक, कौटुंबिक, औद्योगिक, कामगार आणि स्कूल ट्रिब्युनल आदी न्यायालयांमध्ये महालोक आदालत घेतली जाणार आहे. यासाठी खटल्यांचा शोध घेऊन दोन्ही पक्षकारांना न्याय दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)
महालोकअदालत यंदा १३ डिसेंबरला
By admin | Published: October 23, 2014 3:54 AM