मांगीतुंगी येथील भगवान वृषभदेव यांच्या १०८ फुटी विशालकाय मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा गेल्या सात दिवसांपासून सुरू असून, गुरुवारी सकाळी ११ वाजता महामस्तकाभिषेक सोहळ्याला हर्षोत्सवात प्रारंभ झाला. गणिनीप्रमुख ज्ञानमती माताजी, चंदनामती माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रवींद्रकीर्ती स्वामी यांच्या कुशल नेतृत्वाखाली सोहळा सुरू झाला. आचार्य अनेकांतसागर महाराज, आचार्य पद्नंदजी महाराज, आचार्य गुप्तीनंदजी महाराज, आचार्य धर्मनंदजी महाराज, आचार्य बालाचार्य जीनसेन महाराज, आचार्य नितानंद सागर महाराज, आचार्य देवसेन महाराज आदी प्रमुख आचार्यांसह विविध जैन संत-महात्म्यांनी धर्मशास्त्रानुसार मंत्रोचारण करीत असतानाच इंद्र-इंद्राणी बनलेल्या साधन भक्तांनी भगवान वृषभदेवांच्या विशालकाय मूर्तीवर पंचामृत अभिषेकाबरोबरच नारळपाणी, इच्छुकरस (उसाचा रस), दूध, दही, तूप, डाळींबरस, मोसंबीरस, हळदीरस, केशरपाणी आदींसह विविध औषधी अर्कांनी अभिषेककरण्यात आला. नाशिक : ‘बोलो भगवान वृषभनाथकी जय’, ‘बोलो आदिनाथकी जय’, ‘सर्व तीर्थंकरकी जय’ अशा जयघोषात आणि आचार्य गण, मुनीवर, हजारो संत-महात्मे आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत मांगीतुंगी येथील भगवान वृषभदेवांच्या विशालकाय मूर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यास गुरुवारी उत्साहात सुरुवात झाली.आयोजक समिती महामंत्री डॉ. पन्नालाल पापडीवाल, मंत्री सी.आर. पाटील, विजयकुमार जैन, भूषण कासलीवाल, जीवन प्रकाश जैन यांच्यासह लाखो भाविक सोहळ्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे इ.स. २००६मध्ये श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबलीच्या ५८ फूट विशालकाय मूर्तीच्या अभिषेक सोहळ्यातील प्रमुख कार्यवाहक असलेले वीरेंद्र हेगडे हेदेखील महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.प्रथम कलश सन्मान सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या महामस्तकाभिषेक सोहळ्यात विविध १५ प्रकारचे अभिषेक करण्यात आले. प्रथम अमृतकलश सन्मान कमलकुमार जैन-आरा यांना मिळाला, तर प्रथम सिद्धीकलश सन्मान सुरेशकुमार जैन मुरादाबादकर यांना मिळाला.
महामस्तकाभिषेक
By admin | Published: February 19, 2016 3:35 AM