शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘महानंदा’ची रोज ४ लाख लीटर विक्री

By admin | Published: June 01, 2016 2:26 AM

राज्यात सकस गाय दूध पुरवठा करणारी शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) रोज सरासरी साडेतीन ते चार लाख लीटर दूध तर आठ ते दहा टन दुग्धजन्य पदार्थाची विक्री होत

मुंबई : राज्यात सकस गाय दूध पुरवठा करणारी शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) रोज सरासरी साडेतीन ते चार लाख लीटर दूध तर आठ ते दहा टन दुग्धजन्य पदार्थाची विक्री होत आहे, अशी माहिती ‘महानंदा’च्या अध्यक्षा मंदाकिनी एकनाथ खडसे यांनी दिली. महासंघाची वार्षिक उलाढाल ६०० कोटींच्या घरात असून त्यामध्ये वृद्धी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सात एप्रिलला महासंघाच्या अध्यक्षपदी खडसे व उपाधयक्षपदी ज्ञानेश्वर पवार यांची नियुक्ती झालेली आहे. महासंघाच्या कामगिरीचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, राज्य व केंद्र शासनाने नोडल एजन्सी म्हणून महासंघाची नियुक्ती केल्यानुसार विविध योजना राबविण्यात आल्या. त्यात दुग्धव्यवसाय विकासाचा विदर्भ व मराठवाड्यासाठी विशेष कार्यक्रम, सधन दुग्धविकास प्रकल्प - ३ अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. दूध महासंघाच्या व्यवसायाचे विस्तारीकरण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने महानंद दुग्धशाळा गोरेगाव येथे असेप्टिक डेअरी प्लांट उभारण्यात आला. या प्लँटची प्रतिदिन १ लक्ष लिटर्स दूध हाताळणी क्षमता आहे. सध्या अ‍ॅसेप्टीक प्लँटमध्ये टेट्राफिनो व टेट्राब्रिकचे उत्पादन केले जाते. राज्यातील लाखो शेतकरी दूध उत्पादकांना आर्थिक लाभ मिळण्याकरिता दूध महासंघ प्रयत्नशील आहे. त्यासाठी मुंबई शहरात व नवी मुंबई परिसरात भविष्यात अधिकाधिक विक्री केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच, महानंदचे अत्याधुनिक तंत्राने प्रक्रिया व पॅकिंग केलेले व्होलसम दूध टेट्रापॅकमध्ये शहराच्या विविध मॉल्स आणि दुकानांमध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध करण्यात येईल. महासंघाविषयी अधिक माहिती देताना मंदाकिनी खडसे यांनी सांगितले की, महासंघाचा उद्देश राज्यातील दूध संघांकडून जास्तीत जास्त दूध संकलित करुन ग्राहकांना कमीत कमी दरात दूध उपलब्ध करुन देणे हा आहे. जवळपास २५ लाख दूध उत्पादक शेतकरी हे सभासद जिल्हा आणि तालुका दूध संघामार्फत दूध महासंघाशी संलग्न आहेत. जिल्हा दूध संघ २५ आहेत, तर तालुका दूध संघ ६० आहेत. तसेच, राज्यभरात दूध महासंघाचे दुग्धशाळा प्रकल्प गोरेगाव, नागपूर, लातूर, पुणे, वैभववाडी, वरवंड येथे आहेत. गुणनियंत्रण विभागाच्या फूड सेफ्टी स्टँडर्ड आॅथोरिटी आॅफ इंडिया (एफएसएसएआय) यांनी नेमून दिलेल्या २२ परिक्षणांमधून उत्तम असलेलेच निर्भेळ व सकस दूध ग्राहकांना कमीत कमी दरात उपलब्ध करुन देणे हा महासंघाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.पुणे वरवंड येथे असणाऱ्या दूध भुकटी प्रकल्पाबद्दल मंदाकिनी खडसे यांनी माहिती देताना सांगितले की, डिसेंबर २०१४ पासून हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्यात आला. या प्रकल्पाची ३ .५ लक्ष लिटर्स दूध प्रतिदिन हाताळण्याची क्षमता आहे. त्यापासून ३०मे. टन दूध भुकटी प्रतिदिन व १५ मे. टन पांढरे लोणी प्रतिदिन उत्पादित करण्याची क्षमता आहे. (प्रतिनिधी)