मुंबई : महानंदच्या दुधाचा दर २ रुपयांनी कमी करून ते आता ३८ रुपये प्रतिलिटर दराने विकले जाईल, अशी माहिती दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. शिवाय आरेच्या केंद्रांवर महानंदचे दूधविक्री न करणाऱ्यांचे स्टॉल बंद केले जातील, असेही त्यांनी सांगितले.दूधदराबाबत सोमवारी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. जे दूध संघ शासनाने ठरवून दिलेल्या दराने शेतकऱ्यांकडून दूध खरेदी आणि ग्राहकांना विक्री करणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध कारवाई करून संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई करावी, असे निर्देश खडसे यांनी बैठकीत दिले. एमआरपीनुसार जास्त दराने दूध विक्री होत असल्यास त्याच्याविरुद्ध वैधमापन विभागामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. ज्या खासगी दूध उत्पादक संघांनी पाकीटबंद दुधाचे दर एक रुपयाने वाढविले आहेत, त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात येणार आहे. केंद्रावरून आरेचे दूध न विकणारे स्टॉल बंद करणारमुंबईत आरे दूध विक्रीचे मोक्याच्या ठिकाणी सुमारे १,६०० स्टॉल असून, या स्टॉलचा दुरुपयोग होतो. आरेचे दूध या स्टॉलच्या माध्यमातून विकले जात नाही, ही बाब निदर्शनास आल्याने मुंबईत आरेचे दूध न विकणाऱ्या आरे स्टॉलधारकांविरुद्ध कडक कारवाई सुरू करण्यात आली असून, स्टॉल सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील अतिरिक्त दुधाचा वापर एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्यांमध्ये टेट्रापॅकच्या माध्यमातून सुगंधी दूध देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. राज्यातील अतिरिक्त दुधाची भुकटी केली जाते. तिचा वापर शालेय पोषण आहारासाठी आठवड्यातून एक दिवस करण्याचे विचाराधीन असून, १ कोटी मुलांसाठी सुमारे १० हजार टन भुकटी लागणार असल्याचे खडसे यांनी या वेळी सांगितले.दूधभेसळीविरुद्ध मोहीमउद्यापासून अन्न व औषध प्रशासन, वैधमापन व दुग्ध विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त शिष्टमंडळ भेसळयुक्त दुधाविरुद्ध धडक कारवाई मोहीम हाती घेणार आहे. भेसळयुक्त दुधाबद्दल माहिती देण्यासाठी ग्राहकांना लवकरच टोल फ्री क्रमांक देण्यात येणार आहे.
महानंदचे दूध २ रुपयांनी स्वस्त
By admin | Published: May 26, 2015 2:03 AM