शहरं
Join us  
Trending Stories
1
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
2
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
3
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
4
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
5
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
6
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
7
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
8
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
9
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
10
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
11
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
12
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
13
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
14
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
15
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
17
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
18
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
19
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
20
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...

कुंभमेळ्यावर महंत ग्यानदास यांचा बहिष्कार

By admin | Published: February 28, 2015 5:04 AM

पर्यायी शाहीमार्ग साधू-महंतांनी स्वीकारल्यानंतरही त्याची फेरपाहणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याने आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास संतप्त झाले

नाशिक : पर्यायी शाहीमार्ग साधू-महंतांनी स्वीकारल्यानंतरही त्याची फेरपाहणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याने आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास संतप्त झाले आहेत. या सर्व प्रकारास पोलीस आयुक्त हेच जबाबदार असून, त्यांना न हटविल्यास कुंभमेळ्यास येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. या वेळी पर्यायी शाहीमार्गाची फेरपाहणी करण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त नवीन मार्गाबाबत नागरिक आणि साधू-महंतांची दिशाभूल करीत आहेत, त्यामुळे त्यांना तातडीने हटवावे, अशी मागणी यापूर्वीच राज्य सरकारकडे आपण केली होती, ती अद्याप मान्य झालेली नाही, त्यामुळे आता नाशिकच्या कुंभमेळ्यास येणारच नसल्याचे महंत ग्यानदास यांनी शुक्रवारी सांगितले.कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी तपोवन ते रामकुंड अशी साधू-महंतांचे आखाडे तसेच खालसे यांची मिरवणूक निघते. सरदार चौकात अरुंद मार्ग असल्याने तेथे गेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन २८ जण ठार झाले होते. त्यामुळे यंंदा या अरुंद मार्गाऐवजी काट्यामारुती चौकी येथून काळाराम मंदिराकडे न जाता गणेशवाडी मार्गे गाडगे महाराज पुलाखालून मिरवणूक रामकुंडाकडे न्यावी असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मांडला. तो महंत ग्यानदास यांनी स्वीकारला होता. तथापि, पोलीस आयुक्तांची या मार्गास अनुकूलता नव्हती. त्यामुळे महंत ग्यानदास नाराज आहेत. (प्रतिनिधी)