शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

२३६९ ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला सुरुवात; बारामतीत अजितदादा गट-भाजप थेट लढत, गुलाल कोणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 9:39 AM

Gram Panchayat Elections 2023: महायुतीत एकत्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपने बारामतीत मात्र एकमेकांविरोधात मैदानात असल्याचे पाहायला मिळत आहे.

Gram Panchayat Elections 2023: राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत असून, मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, अनेक ठिकाणच्या लढतींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यात मात्र ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात अजित पवारांचे कुटुंब ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट आणि भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीत असूनही अजित पवार गट आणि भाजपने एकमेकांविरोधात पॅनेल उभी केल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली ही ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी दरवेळी महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका निवडणुका पार पडतात. पण यावेळी महापालिका निवडणुकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. महापालिका निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणुका मानले जाते. आता राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत असल्यामुळे जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे? हे या निवडणुकांमधून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

बारामतीत अजित पवार गट आणि भाजपमध्ये थेट लढत

पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या काटेवाडी ग्रामपंचायतीचा समावेश होतो. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचे मतदान काटेवाडी ग्रामपंचायतमध्ये आहे. या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पॅनलच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून पॅनेल निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले. यामुळे या ठिकाणची लढत लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. इंदापूर तालुक्यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

दरम्यान, काटेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचाच विजय होईल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी मतदानावेळी व्यक्त केला आहे. मी १९५७ पासून काटेवाडीत मतदान करते आहे. पुर्वीच्या काटेवाडीत आणि आताच्या काटेवाडीत भरपूर बदल झाले आहेत. अनेकांनी यासाठी हातभार लावला आहे. राज्यातील अनेकांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, असे सगळ्यांना वाटते. तसेच आई म्हणून माझ्यादेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. माझे वय आता ८४ झाले आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे मलाही अजित पवारांना मुख्यमंत्री झालेले बघायला आवडेल, अशी इच्छा अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी बोलून दाखवली. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारBJPभाजपा