महाराष्ट्रानेच भाजपचा ४०० पारचा रथ रोखला : रमेश चेन्निथला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 13:46 IST2024-08-10T13:45:32+5:302024-08-10T13:46:19+5:30
यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदेश काँग्रेसच्या एस. सी. विभागाचा विजय संकल्प मेळावा पार पडला. मेळाव्याला प्रभारी चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया, काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड उपस्थित होते.

महाराष्ट्रानेच भाजपचा ४०० पारचा रथ रोखला : रमेश चेन्निथला
मुंबई : भाजपचा ४०० पारचा रथ महाराष्ट्रानेच रोखला. काँग्रेस पक्ष एससी, एसटी, मागास समाजाला प्राधान्य देत आहे, लोकसभेच्या निवडणुकीत समाजाचे प्रतिनिधीत्व वाढले. विधानसभेतही असाच विजय संपादन करावयाचा आहे. एससी एसटी प्रवर्गाच्या ५४ जागा आहेत. विधानसभेला एससी, एसटी प्रवर्गाच्या जागा लढवण्याच्या प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल, असे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले.
यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदेश काँग्रेसच्या एस. सी. विभागाचा विजय संकल्प मेळावा पार पडला. मेळाव्याला प्रभारी चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया, काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड उपस्थित होते.
काँग्रेसची न्याय यात्रा
मुंबईकरांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई काँग्रेसने शनिवारी, १० ऑगस्ट रोजी मुंबई न्याय यात्रेचे आयोजन केले आहे. न्याय यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांकडे लक्ष वेधले जाणार आहे तसेच महायुती सरकारच्या विरोधात महायुतीचे पापपत्र जनतेच्या हाती दिले जाणार आहे, अशी माहिती खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.
चेन्निथला म्हणाले...
- जास्तीत जास्त समाजाला आरक्षणाचा लाभ द्यायचा असेल तर जातनिहाय जनगणना करावी लागणार आहे. तसेच ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी लागणार आहे.
- नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा संसदेला नमन केले आणि संसद भवन बदलले. यावेळी मोदींनी संविधानाला नमन केले. आता ते बाबासाहेबांचे संविधान संपवायला निघाले आहेत.
- देशात सर्वांत जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रातील महायुती सरकारने केला आहे. विकासकामे होत नाहीत फक्त लूट सुरू आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर ७० हजार कोटींचा आरोप केला, प्रफुल्ल पटेलांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, असे असले तरी त्यांनाही भाजपत प्रवेश देऊन पवित्र केले.