मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान भोकरदन तालुक्यातील एका ठिकाणी भाषण करताना जोपर्यंत मी आहे तोपर्यंत गोहत्या बंद होणार नसल्याचा विधान भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मात्र गोहत्याबद्दल कोणतेही विधान केले नसून, त्या व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आली असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. त्याबाबतचे त्यांनी प्रसिद्ध पत्रक काढले आहे.
केंद्र सरकारकडून गोहत्या बंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर, तेव्हा बकरी ईद आली. काही लोकं माझ्याकडे आले. तसेच सरकारने गोहत्या बंदीचा घेतलेल्या निर्ण्यानंतर आम्ही काय करावे असे त्यांनी विचारले. तेव्हा मी त्यांना सांगितले होते. जोपर्यंत रावसाहेब दानवे आहे, तोपर्यंत गोहत्या बंद होणार नाही. दानवेंचा असे वक्तव्य करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र यावर दानवे यांनी खुलासा केला आहे.
मात्र यावर दानवे यांनी खुलासा करताना म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यानच्या काळात भोकरदन तालक्यातील कठोरा बाजार येथे भाषण करताना, गोहत्याबंदी विरोधात मी विधान केल्याचे एक व्हिडिओ समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र मी असे कोणतेही विधान केले नसून, त्या व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा दावा दानवे यांनी केला आहे.