मुंबई : राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडले. सामान्य नागरिकांसह, राजकरणी आणि सेलेब्रिटींही आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यात याला गालबोट लागले. औरंगाबादमध्ये एमआयएम-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये हाणामारीची घटना तर जालना जिल्ह्यातील दोन गटातील राडा पाहायला मिळाला. त्याचबरोबर पाटोदा मतदारसंघातून बीड मतदारसंघात बोगस मतदार मतदानासाठी आणल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी गोंधळ घातल्याने आज मराठवाडा विविध राड्याने गाजला.
सकाळपासून मतदानाला शांतेत सुरवात झाली असतनाच, पाटोदा मतदारसंघातून बीड मतदारसंघात बोगस मतदार मतदानासाठी आणल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी गोंधळ घातल्याचे समोर आले. तर शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेतील कर्मचारीयांच्याकडून बोगस मतदान करण्यात येत असल्याचे त्यांनी आरोप केला.
ही घटना ताजी असतानाचं जालन्यातील अंबडच्या जामखेडमध्ये दोन गटात धक्काबुक्की झाली. भाजपचे सरपंच आणि राष्ट्रवादीच्या उपसरपंचाच्या गटात ही मारहाण झाली असल्याचे पाहायला मिळाले. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर सुद्धा व्हायरल झाला आहे.
तर मतदानाच्या शेवटच्या टप्यात औरंगाबादमध्ये खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे मध्य चे उमेदवार कदीर मौलाना यांच्यामध्ये कटकटी गेट येथे बाचाबाची होऊन जोरदार हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले. यामध्ये खासदार इम्तियाज जलील यांचे कपडे सुद्धा फाटले. त्यामुळे या तिन्ही घटनांमुळे मराठवाड्यातील मतदान प्रकियेला गालबोट लागले.